रणबीरसाठी लकी ठरणार का हा वाढदिवस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 11:54 IST2016-09-28T05:02:37+5:302016-09-28T11:54:20+5:30
बॉलिवूडचा लव्हरबॉय रणबीर कपूर याचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. ऋषी व नीतू कपूर यांचा मुलगा आणि राजकपूर यांचा नातू ...

रणबीरसाठी लकी ठरणार का हा वाढदिवस?
ब लिवूडचा लव्हरबॉय रणबीर कपूर याचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. ऋषी व नीतू कपूर यांचा मुलगा आणि राजकपूर यांचा नातू असा मोठा वारसा असलेला घेऊन जन्मलेला रणबीर म्हणजे स्टार किड्स. स्टारकिड्सच्या वाट्याला बॉलिवूडमध्ये फारसा संघर्ष येत नाही, असे मानल्या जाते. यात बरीच सत्यताही आहे. रणबीरच्या बाबतीतही हे खरे म्हणता येईल. ज्या दिग्दर्शकासोबत काम करण्यास अनेक कलाकार धडपडतात. त्या भन्साळींच्या ‘सावरियां’मधून रणबीरने बॉलिवूड डेब्यू केले. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला. पण त्याच्या या पहिल्याच चित्रपटासाठी रणबीरला ‘बेस्ट मेल डेब्यू’च्या फिल्म फेअर अवार्डने गौरविण्यात आले. ‘सावरियां’नंतर ‘बचना ऐ हसीनों’, ‘वेक अप सीड’, ‘रॉकेट सिंग: सेल्समन आॅफ दी ईअर’,‘राजनीति’, ‘अंजाना-अंजानी’,‘रॉकस्टार’ या चित्रपटात रणबीर झळकला. पण यापैकी एकही चित्रपट बॉक्सआॅफिस फारसी कमाल दाखवू शकला नाही. ‘तमाशा’मधील रणबीरच्या भूमिकेचे अपार कौतुक झाले. पण तोही आपटला. नाही म्हणायला ‘रॉकस्टार’ने रणबीरला ‘बेस्ट अॅक्टर’अवार्ड मिळवून दिला. पण हे चित्रपट रणबीरच्या करिअरचा आलेख उंचावू शकले नाहीत. अर्थात यानंतर आलेल्या ‘बर्फी’ने रणबीरच्या करिअरला वेग दिला. ‘बर्फी’मध्ये त्याने मुका अन् बहिरा प्रियकर साकारला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट चांगलाच हिट झाला. शिवाय यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा चित्रपटही रणबीरच्या झोळीत पडला. या चित्रपटाने रणबीरला वेगळी ओळख दिली. पाठोपाठ आलेल्या ‘ऐ जवानी है दिवानी’ या चित्रपटानेही रणबीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. दीपिकासोबतची त्याची रोमॅन्टिक कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच अपील झाली आणि बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट चांगलाच हिट झाला. पण या उण्यापु-या दोन हिट्स नंतर रणबीरला यशाची चव तशी चाखताच आली नाही.
![]()
२०१५ मध्ये रणबीर कपूर अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये झळकला. या चित्रपटाकडून रणबीरलाच नव्हे तर त्याच्या तमाम चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण अनुरागचा हा चित्रपट तितकाच दणकून आपटला. यानंतर रणबीरच्या करिअरला जी ओहटी लागली, ती अद्यापही कायम आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ने तर त्याच्यावरील अपयशाचा ठसा आणखी गडद केला. इतका की, रणबीरच्या अपयशासाठी मीच जबाबदार आहे, हे अनुरागलाही फिल झाले. तो तसे जाहीरपणे बोलून गेला. ‘बॉम्बे वेल्वेट’नंतर रणबीरला नव्या हिटची गरज आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ यानिमित्ताने रणबीरच्या हातात एक संधीही आहे. ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा यांच्यासोबत रोमान्स करताना रणबीर यात दिसणार आहे. ऐश्वर्या व रणबीरच्या हॉट अॅण्ड हॉटेस्टची चर्चा आधीच सुरु झाली आहे. आता याच चित्रपटाच्या यशाअपयशावर रणबीरच्या करिअरचा आलेख मांडला जाणार आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ बॉक्सआॅफिसवर हिट झालाच तर रणबीरसाठी निश्चिपणे ती वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे.