'धुरंधर २' मध्ये पुन्हा दिसणार रहमान डकैत? चाहत्यांनी लावलाय मोठा शोध, वाचून तुम्हीही थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:53 IST2026-01-01T12:50:01+5:302026-01-01T12:53:26+5:30
'धुरंधर पार्ट २' मध्येही अक्षय खन्नाची एन्ट्री होणार असल्याचा शोध चाहत्यांनी लावला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल आणि आनंदही होईल

'धुरंधर २' मध्ये पुन्हा दिसणार रहमान डकैत? चाहत्यांनी लावलाय मोठा शोध, वाचून तुम्हीही थक्क व्हाल
दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटातील रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक होत असलं तरी, खलनायक 'रेहमान डकैत' साकारणाऱ्या अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता सोशल मीडियावर चाहत्यांनी एक नवीन शोध लावला आहे. ज्यामुळे 'धुरंधर २' मध्ये अक्षय खन्नाची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
अक्षय खन्ना 'धुरंधर पार्ट २'मध्ये दिसणार?
'धुरंधर' चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शेवटी रेहमान डकैतचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते, त्यामुळे दुसऱ्या भागात अक्षय खन्ना दिसणार नाही हे स्पष्ट होतं. मात्र, नेटकऱ्यांनी अक्षय खन्नाचे विकिपीडिया पेज तपासले असून तिथे एक खास गोष्ट आढळून आली. ती म्हणजे, अक्षयच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'धुरंधर पार्ट २'चा उल्लेख दिसला आहे. याशिवाय 'धुरंधर पार्ट २' हा चित्रपट सध्या 'पोस्ट-प्रोडक्शन' टप्प्यात असल्याचेही तिथे नमूद करण्यात आले आहे. या एका माहितीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अक्षय खन्नाची 'धुरंधर २' मध्ये एन्ट्री कशी होऊ शकते, यावर चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लावले आहेत. काहींच्या मते, चित्रपटात रेहमान डकैतच्या भूतकाळातील काही महत्त्वाच्या घटना फ्लॅशबॅकच्या माध्यमातून दाखवल्या जाऊ शकतात, तर काहींना वाटते की रणवीर सिंगच्या पात्राला रेहमान डकैतचा भास होत असल्याचे दाखवले जाईल. एका युजरने असाही दावा केला आहे की, ट्रेलरमध्ये अक्षय खन्नाचे असे काही सीन्स आहेत जे पहिल्या भागात दाखवण्यात आलेले नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्या भागात समाविष्ट असू शकतात.

'धुरंधर' विषयी...
२०२५ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'धुरंधर'ने आतापर्यंत भारतात ७२२ कोटींहून अधिक आणि जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अक्षय खन्नाचा या चित्रपटातील 'शेर-ए-बलोच' लूक आणि त्याचा डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे 'रेहमान डकैत' या पात्राची लोकप्रियता पाहता, निर्माते अक्षयला दुसऱ्या भागात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच समोर आणतील अशी चाहत्यांना खात्री आहे. 'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.