करण जोहरच्या सिनेमातून न्यासा देवगण करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, काजोल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 17:50 IST2025-09-19T17:50:09+5:302025-09-19T17:50:55+5:30

Ajay Devgn And Kajol daughter Nyasa Devgan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, पण सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे.

Will Nysa Devgan make her Bollywood debut with Karan Johar's film?, Kajol says... | करण जोहरच्या सिनेमातून न्यासा देवगण करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, काजोल म्हणाली...

करण जोहरच्या सिनेमातून न्यासा देवगण करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री?, काजोल म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल(Kajol)ची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgan) तिच्या लुकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते, पण सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरला त्याच्या चित्रपटात तिला लाँच करायचे आहे. पण अद्याप कोणतीही गोष्ट निश्चित झालेली नाही. यामागचं कारण आता न्यासाची आई काजोलने सांगितले आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि मुलगी न्यासाच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पण करण्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. काजोल म्हणाली, ''जर न्यासाला चित्रपटांमध्ये यायचे असेल, तर ती आम्हाला स्वतःहून सांगू शकते आणि आमचे संपूर्ण कुटुंब तिला यामध्ये पूर्ण पाठिंबा देईल.''

न्यासाला चित्रपटांमध्ये यायचे नाही - काजोल
काजोल पुढे म्हणाली की, ''न्यासा आता २२ वर्षांची होणार आहे. मला वाटते की तिने तिचा निर्णय घेतला आहे, तिला चित्रपटांमध्ये यायचे नाही.'' अजय आणि काजोल यांची मोठी मुलगी न्यासाने स्वित्झर्लंडमधील ग्लियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमधून 'इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी'मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA) ची पदवी मिळवली आहे.

अजय देवगण म्हणालेला...
अजय देवगणनेही यापूर्वी आपल्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगितले होते. 'कॉफी विथ करण'च्या ८व्या सीझनमध्ये तो म्हणाला होता, ''सध्या तरी न्यासाचा चित्रपटात येण्याचा कोणताही विचार नाही. मला वाटत नाही की तिला अभिनय करायचा आहे. सध्या याची शक्यता शून्य टक्के आहे. जर तिने तिचा विचार बदलला, तर लोक माझी ही जुनी मुलाखत नक्कीच बाहेर काढतील.'' 

Web Title: Will Nysa Devgan make her Bollywood debut with Karan Johar's film?, Kajol says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.