मल्लिका शेरावत 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री? सोडलं मौन, म्हणाली - "कधीच करणार नाही.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:38 IST2025-07-28T19:35:38+5:302025-07-28T19:38:40+5:30
Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस १९' शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. हा शो या वर्षी ऑक्टोबर पूर्वी टेलीकास्ट होणार आहे.

मल्लिका शेरावत 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री? सोडलं मौन, म्हणाली - "कधीच करणार नाही.."
सलमान खान(Salman Khan)च्या 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. हा शो या वर्षी ऑक्टोबर पूर्वी टेलीकास्ट होणार आहे. यावेळी बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) देखील या शोमध्ये सामील होणार असल्याचे वृत्त आहे. पण आता अभिनेत्रीने स्वतः या वृत्तांवर मौन सोडले आणि एक पोस्ट शेअर केली.
मल्लिका शेरावतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, ''मी सर्व अफवा फेटाळत आहे. मी बिग बॉस करत नाही आणि कधीही करणार नाही. धन्यवाद...'' अभिनेत्रीची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे शोमध्ये तिच्या प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
मल्लिका शेरावत बऱ्याच वर्षांपूर्वी भारतातून लॉस अँजेलिसला शिफ्ट झाली आहे. मात्र, कामाच्या निमित्ताने ही अभिनेत्री अनेकदा इथे येते. ही अभिनेत्री शेवटची राजकुमार रावच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. अभिनेत्री मल्लिका शेरावत सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. वयाच्या ४८ व्या वर्षीही ती चांगलीच फिट आहे. बऱ्याचदा ती बिकिनीमध्ये तिच्या कर्व्ही फिगर दाखवतानाही दिसते. चाहतेही तिचे कौतुक करताना दिसतात.
'बिग बॉस १९' कधी सुरू होणार?
सलमान खानच्या वादग्रस्त शो 'बिग बॉस १९'बद्दल सांगायचं झालं तर, हा शो यावेळी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतो. मात्र निर्मात्यांनी अद्याप शोच्या प्रीमियरची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. यावेळी शोमध्ये अनेक इंटरेस्टिंग स्पर्धकही दिसतील. दरवर्षीप्रमाणे, सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.