​बाहुबली होणार कन्नडमध्ये डब?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 10:16 AM2017-02-21T10:16:52+5:302017-02-21T15:46:52+5:30

बाहुबली द बिगिनिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. या चित्रपटाने आजवरचे भारतीय चित्रपटांचे सगळे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड ...

Will Dubbo be dubbed in Kannada? | ​बाहुबली होणार कन्नडमध्ये डब?

​बाहुबली होणार कन्नडमध्ये डब?

googlenewsNext
हुबली द बिगिनिंग या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले. या चित्रपटाने आजवरचे भारतीय चित्रपटांचे सगळे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाच्या शेवटी एक प्रश्न अनुत्तरीत राहिला होता. हा चित्रपट पाहून आलेल्या प्रत्येकाला कटप्पाने बाहुबली को क्यों मारा हाच एक प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना बाहुबली द कन्क्ल्युजन या चित्रपटात मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून हा चित्रपट 28 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास, तमन्ना, अनुष्का शेट्टी, राणा दग्गुबती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कित्येक करोड कमवले असल्याचेदेखील म्हटले जात आहे. या चित्रपटाचे अनेक भाषांमध्ये डबिंग होणार असल्याची चर्चा आहे. आता या चित्रपटाचे कन्नड भाषेत डबिंग होणार असल्याचे म्हटले जात आहे. 
कन्नड फिल्म चेम्बर ऑफ कॉमर्स हा चित्रपट कन्नड भाषेत डब करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. 
कन्नड फिल्म चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कृष्णगौवडा यांच्यामते बाहुबली या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस राजमौली आणि त्यांचे वडील विजेंद्र प्रसाद यांच्यासोबत चित्रपट कन्नडमध्ये डब करण्याबाबत माझी चर्चा झाली आहे. हा चित्रपट कन्नडमध्ये डब करण्यास ते सकारात्मक असल्याचे त्यांच्यांशी बोलल्यावर मला जाणवले आहे. हा चित्रपट कन्नडामध्ये डब व्हावा यासाठी अनेक ऑनलाइन कॅम्पेन्स सुरू आहेत. त्यामुळे हा चित्रपट कन्नड भाषेत डब व्हावा अशी सगळ्याच कन्ऩडभाषिकांची इच्छा आहे. 
बाहुबली द कन्क्ल्युजन हा चित्रपट कन्नडामध्ये डब होतो की नाही हे काहीच दिवसांमध्ये आपल्याला कळेल. 

Web Title: Will Dubbo be dubbed in Kannada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.