​चिरंजीवीची पुतणी निहारिका होणार का 'बाहुबली' प्रभासची वधू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 14:49 IST2018-04-08T09:19:32+5:302018-04-08T14:49:32+5:30

साऊथ सुपरस्टार प्रभास याच्यामागे आजघडीला किती तरूणी वेड्या असतील, याची मोजदाद नाही. कारण एक लोकप्रीय सुपरस्टार असण्यासोबतचं प्रभास एक ...

Will the bride of Chiranjeevi become a nephew of 'Bahubali' bride? | ​चिरंजीवीची पुतणी निहारिका होणार का 'बाहुबली' प्रभासची वधू?

​चिरंजीवीची पुतणी निहारिका होणार का 'बाहुबली' प्रभासची वधू?

ऊथ सुपरस्टार प्रभास याच्यामागे आजघडीला किती तरूणी वेड्या असतील, याची मोजदाद नाही. कारण एक लोकप्रीय सुपरस्टार असण्यासोबतचं प्रभास एक ‘मोस्ट एलीजेबल बॅचलर’ही आहे. साहजिकचं सध्या प्रभास लाखो तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ आहे. त्यामुळेचं त्याच्या लग्नाची बातमी आली की, या लाखो तरूणींची निराशा होते. पण प्रभासच्या लग्नाकडे डोळे लावून बसलेलेही अनेक चाहते आहे.  अशा चाहत्यासाठी निश्चितपणे आमच्याकडे एक आनंदाची बातमी आहे. होय, प्रभास लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असल्याचे कळतेय. आता ‘ती’ कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी हे पहिले नाव तुमच्या डोक्यात आले असेल तर ते चूक आहे. कारण चर्चा काही वेगळीच आहे. होय, साऊथचा मेगास्टार चिरंजीवी याची पुतणी निहारिका हिच्यासोबत लग्न करणार असल्याची खबर आहे.   निहारिका ही तेलगू अभिनेत्री आहे. २०१५ मध्ये ‘Oka Manasu’ या चित्रपटाद्वारे तिने तेलगू इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. प्रभास व निहारिका यांच्या लग्नाची बोलणी सुरू असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. अर्थात चिरंजीवी यांनी ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.



ALSO READ : अनुष्का शेट्टीने पुन्हा एकदा नाकारला बॉलिवूडचा चित्रपट! कारण आहे प्रभास!!

 खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास आणि अनुष्का यांच्या लिंकअपच्या बातम्या जोरात होत्या. चाहत्यांनाही प्रभास व अनुष्का या जोडीला रिअल लाईफ कपल म्हणून पाहण्यास उत्सूक आहेत. पण प्रभासच्या मनात नेमके काय चालू आहे, याचा अंदाज बांधणे तूर्तास तरी कठीण आहे.
अलीकडे प्रभासला अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत प्रश्न विचारला गेला होता.  हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता. 

Web Title: Will the bride of Chiranjeevi become a nephew of 'Bahubali' bride?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.