अमिषा पटेल या पाकिस्तानी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ?, म्हणाली - "आम्ही दोघे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:58 IST2025-01-25T10:57:07+5:302025-01-25T10:58:29+5:30
Ameesha Patel : अभिनेत्री अमिषा पटेल बऱ्याचदा लव्ह लाइफमुळे चर्चेत येत असते.

अमिषा पटेल या पाकिस्तानी अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ?, म्हणाली - "आम्ही दोघे..."
अभिनेत्री अमिषा पटेल(Ameesha Patel)ने २००० मध्ये 'कहो ना प्यार है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००१ मध्ये, तिने गदर: एक प्रेम कथा सोबत आणखी एक हिट चित्रपट दिला. तिच्या करिअरची सुरुवात तर चांगली झाली असली तरी नंतर तिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. ४९ वर्षांची अमिषा अजूनही अविवाहित आहे. अलिकडेच पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास(Imran Abbas)सोबतच्या ती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अफवा चर्चेत आहेत. मात्र, अमिषाने या अफवांवर मौन सोडले आणि म्हणाली की, दोघांमध्ये रोमँटिक असं काहीही नाही.
काही दिवसांपूर्वी अमिषाचे अभिनेता इमरान अब्बाससोबतचे फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर मौन सोडत अमिषा हिंदी रशशी बोलली आणि म्हणाली, ''गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे सुरू आहे. काय कोणते लग्न झाले का? परदेशात आयोजित कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये आम्ही भेटलो. आम्ही चांगले मित्र आहोत, त्यापेक्षा जास्त काही नाही. लोकांना फक्त गॉसिपची संधी हवी असते. दोन चांगले दिसणारे लोक एकत्र दिसले तर अफवा सुरू होतात. तो अविवाहित आहे, मी अविवाहित आहे आणि लोक लग्नाबद्दल बोलू लागतात ज्यात काही तथ्य नसते. त्यामुळे अशा अफवा पसरतात. म्हणूनच त्यांना अफवा म्हणतात.''
कोण आहे इमरान अब्बास?
१५ ऑक्टोबर १९८२ रोजी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे जन्मलेला इमरान अब्बास हा पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने २००३ मध्ये उमराव जान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि नंतर अनेक मालिकांमध्ये दिसला. २०११ च्या खुदा और मोहब्बत या आध्यात्मिक-रोमँटिक मालिकेत हम्माद रझाची भूमिका साकारल्यानंतर तो देश आणि जगात लोकप्रिय झाला. हा त्याच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. २०१४ मध्ये, त्याने विक्रम भटच्या क्रिएचर थ्रीडी मध्ये बिपाशा बासूसोबत बॉलिवूडमध्ये काम केले. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१५ मध्ये, अब्बासने मुझफ्फर अली दिग्दर्शित जानीसारमध्ये पर्निया कुरेशी सोबत काम केले होते.