'हमराज 2' मध्ये' पुन्हा एकत्र दिसणार अक्षय खन्ना अन् बॉबी देओलची जोडी? 'त्या' चर्चांवर निर्माते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:02 IST2026-01-07T17:58:17+5:302026-01-07T18:02:13+5:30
'हमराज 2' मध्ये पुन्हा एकत्र दिसणार अक्षय खन्ना अन् बॉबी देओलची जोडी, चर्चांवर निर्मात्याने सोडलं मौन

'हमराज 2' मध्ये' पुन्हा एकत्र दिसणार अक्षय खन्ना अन् बॉबी देओलची जोडी? 'त्या' चर्चांवर निर्माते म्हणाले...
Humraaz 2 Update: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोताता आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटातील त्याच्या कामाचं सगळेच कौतुक करत आहेत. 'धुरंधर' नंतर अक्षय खन्नाला चांगलाच स्टारडम मिळाला आहे. असंच काहीसं 'अॅनिमल' नंतर बॉबी देओलच्या बाबतीत घडलं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोन नावांची प्रचंड क्रेझ आहे. अशातच मागील काही दिवसांपासून अक्षय खन्ना आणि बॉबी देओलाचा हमराज सिनेमाचा सीक्वल येणार अशी चर्चा होत पसरली होती. त्यामुळे सिनेरसिक देखील प्रचंड उत्सुक आहेत. आता या चर्चांवर खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२००२ साली अब्बास-मस्तान या दिग्दर्शित 'हमराज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
या चित्रपटात अक्षय खन्ना, अमिषा पटेल आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हमराजमध्ये अक्षय खन्ना करण मल्होत्राच्या नकारात्मक भूमिकेत दिसला होता. धुरंधरमधील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांना हमराज ची आठवण करुन दिली. त्यानंतर हेमराजचा सीक्वल येणार का याची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा रंगली. अलिकडेच चित्रपट निर्माते रतन जैन यांनी 'बॉलिवूड हंगामा'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांना चित्रपटाच्या सीक्वलबाबत विचारण्यात आलं. त्या प्रश्नाचं उत्तर देत ते म्हणाले," जर मला या दोन कलाकारांसाठी उत्तम स्क्रिप्ट मिळाली, तर मी 'हमराज २' नक्की बनवेन.आम्हाला अशी कथा हवी आहे, ज्यात ते दोघेही चपखल बसतील आणि त्यांच्या वयाला साजेशा त्या भूमिका असतील."
या मुलाखतीत निर्माते रतन जैन यांनी अक्षय खन्ना आणि बॉबी देओलसोबत काम करण्याचा अनुभव सुद्धा शेअर केला. तेव्हा ते म्हणाले, "बॉबीसोबत काम करायला मजा येते. अक्षयच्या बाबतीतही तेच आहे. या प्रचंड यशानंतर अक्षयला थोडं सेटल होऊद्या. मी त्याला भेटण्याचा प्रयत्न करेन. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्याला अधिक चांगले चित्रपट मिळायलाच हवेत." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला.