का करतोय रणवीर ‘पद्मावती’ च्या शूटींगला उशीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 13:52 IST2016-09-20T08:19:04+5:302016-09-20T13:52:22+5:30

 दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. त्यातील कलाकार आणि पटकथा यांच्यामुळे चर्चेला उधाण आले ...

Why Ranveer 'Padmavati' shootout is delayed? | का करतोय रणवीर ‘पद्मावती’ च्या शूटींगला उशीर?

का करतोय रणवीर ‘पद्मावती’ च्या शूटींगला उशीर?

 
िग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. त्यातील कलाकार आणि पटकथा यांच्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर हे मुख्य भूमिकेत असतील, असे भन्साळींनी फार पूर्वीच सांगितले होते.

मागील आठवड्यातच चित्रपटाची शूटींग सुरू व्हायला हवी होती. पण, अद्याप ती झालेली नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणाला उशीर का होतोय याबद्दल विचारणा केली असता कळाले की,‘रणवीर सिंग म्हणतोय, मी तेव्हाच चित्रपटात काम करेन जेव्हा शाहिदचा रोल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेएवढा लहान करण्यात येईल.’  

पण, हे भन्साळींना मान्य नाही. भन्साळींनी ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यासारखे बिगबजेट चित्रपट रणवीरला देऊनही तो असे वर्तन का करतोय? शेवटी भन्साळींनी दीपिकाला रणवीरशी बोलण्यास सांगितले. त्याला चित्रपटासाठी तयार व्हायला सांगितले. रणवीरशिवाय चित्रपटाची शूटींग सुरूच होऊ शकत नाही. पाहूयात काय होतेय ते...दीपिकाचे तरी तो ऐकतो की नाही ते...

Web Title: Why Ranveer 'Padmavati' shootout is delayed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.