म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 10:22 IST2019-12-24T10:22:07+5:302019-12-24T10:22:43+5:30

कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

This Is Why Kangna Ranaut Selling Tain Tickets In Mumbai Railway Station | म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं !

म्हणून बॉलीवुडची क्वीन कंगना फाडणार प्रवाशांची तिकीटं !

सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलीवुडमध्ये एकाहून एक फंडे दिवसागणिक समोर येतायत... प्रत्येकाचा फंडा अजब असतो... सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात... छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना बॉलिवूडची क्वीन समजली जाणारी कंगना राणौत आता अनोख्या ढंगात तिचा आगामी  पंगा सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. सिनेमात साकारलेली रेल्वे कर्मचाऱ्याची भूमिका कंगना प्रत्यक्षात करताना दिसणार आहे. होय, यासाठी ती मुंबईतील वेगवेळ्या रेल्वे स्थानकावर चक्क तिकीट काऊंटरवर प्रवाशांना तिकीट देताना दिसणार आहे.

 

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कंगनाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. आता रसिकांना कंगनाच्या बहुप्रतिक्षित पंगा सिनेमाची उत्सुकता लागली आहे. हा सिनेमा कबड्डी खेळावर आधारीत आहे. एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत  कंगना झळकणार आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

'पंगा'विषयी बोलताना अश्विनी अय्यर तिवारी म्हणाली होती की, 'या सिनेमात कंगना रानौतची बॉडी डबल वापरायची नव्हती. त्यामुळे कंगनाला ट्रेनिंग घ्यायला सांगितले. तर कंगनाने देखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय  केला. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ देखील नवा होता. या सिनेमासाठी तिने खूप मेहनत घेतली असून नक्कीच हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल अशी आशा आहे. 'पंगा' सिनेमा 24 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: This Is Why Kangna Ranaut Selling Tain Tickets In Mumbai Railway Station