वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:05 IST2025-04-26T16:04:58+5:302025-04-26T16:05:34+5:30

Vinod Khanna And Akshaye Khanna : अक्षय खन्नाने विनोद खन्ना यांच्यासोबत त्याचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. यानंतर, त्याने कधीही या अनुभवी अभिनेत्यासोबत काम केले नाही.

Why didn't he want to work with his father Vinod Khanna? The shocking reason given by 'Chhawa' fame Akshaye Khanna | वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण

वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण

अभिनेता अक्षय खन्ना (Akshaye Khanna) हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा आहे. अक्षयने विनोद खन्ना यांच्यासोबत त्याचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र'मध्ये स्क्रीन शेअर केली होती. यानंतर, 'दिल चाहता है' फेम अभिनेत्याने कधीही या अनुभवी अभिनेत्यासोबत काम केले नाही. एका मुलाखतीत त्याने त्याच्या वडिलांसोबत काम न करण्याचे कारण सांगितले होते आणि असेही म्हटले होते की, आणखी एक सुपरस्टार आहे ज्याच्यासोबत त्याने काम केले नाही पाहिजे.

अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट 'हिमालय पुत्र' १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने दिवंगत अभिनेते आणि त्यांचे वडील विनोद खन्ना यांच्याव्यतिरिक्त हेमा मालिनी, जॉनी लिव्हर, सतीश शाह, डॅनी डेन्झोंगपा आणि अमरीश पुरी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अंजली जावेरी आणि शाजिया मलिक देखील होत्या. अक्षय खन्ना आणि त्याचे वडील विनोद खन्ना यांचे नाते गुंतागुंतीचे होते असे म्हटले जाते, मात्र तरीदेखील, अक्षय खन्नाने  त्याचे वडील विनोद यांचा आणि त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आदर केला. २००८ मध्ये, अक्षय खन्नाने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, विनोद खन्ना यांच्यासोबत काम करणे हा एक भयानक अनुभव होता आणि तो पुन्हा कधीही त्यांच्यासोबत काम करणार नाही. तो म्हणाला, "काही लोक आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही काम करू नये. माझे वडील त्यापैकी एक आहेत. अमिताभ बच्चन हे दुसरे आहेत. त्यांच्यासोबत एकाच चौकटीत आत्मविश्वासाने उभे राहणे अशक्य आहे."

अक्षय खन्नाने सांगितलं कारण

अक्षय खन्नाने त्याचे वडील विनोद खन्ना यांच्यासोबत कधीही काम न करण्याचे कारणही सांगितले. तो म्हणाला, "त्यांची पडद्यावरचा वावर खूप प्रभावी आहे. पडद्यावर माझ्या वडिलांची बरोबरी करणे खूप कठीण आहे. हा एक गुण आहे की तो तुमच्याकडे आहे किंवा नाही. खरे सांगायचे तर, माझ्याकडे तो नाही, माझ्याकडे फक्त त्या प्रकारची उपस्थिती नाही. असे काही कलाकार आहेत जे तुम्हाला पडद्यावर पूर्णपणे भारावून टाकतात, माझे वडील त्यापैकी एक आहेत."

अक्षय खन्ना वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अक्षय खन्ना शेवटचा विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात दिसला होता. त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. 

Web Title: Why didn't he want to work with his father Vinod Khanna? The shocking reason given by 'Chhawa' fame Akshaye Khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.