अचानक फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतलेला? विक्रांत मेस्सीने अखेर खरं कारण सांगितलंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:27 IST2026-04-09T12:17:11+5:302026-04-09T12:27:51+5:30
'१२वी फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या चांगलाच चर्चेत आहे. यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याने अचानक अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने या निर्णयामागचे खरे आणि भावनिक कारण स्पष्ट केले आहे.

अचानक फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतलेला? विक्रांत मेस्सीने अखेर खरं कारण सांगितलंच
'१२वी फेल' फेम अभिनेता विक्रांत मॅसी (Vikrant Massey) सध्या चांगलाच चर्चेत आहे. यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याने अचानक अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने या निर्णयामागचे खरे आणि भावनिक कारण स्पष्ट केले आहे.
विक्रांतला आहे 'डॅड्स गिल्ट'?
एका मुलाखतीत बोलताना विक्रांतने सांगितले की, तो 'डॅड्स गिल्ट' जात होता. विक्रांत गेल्या वर्षी बाबा झाला आहे. मात्र, चित्रपटांचं शूटिंग आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. त्याने सांगितलं की, "एकदा माझा मुलगा बाबा बोलण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याच्या आजीला भेटायला गेला होता. परंतु तो बाबा नीट बोलू शकला नाही. या घटनेमुळे बाळासाठी घरी थांबणं किती गरजेचं आहे, याची विक्रांतला जाणीव झाली. पुढे दोन महिन्यांनी विक्रांतने कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.''
विक्रांत पुढे म्हणाला, ''कामात असताना आपण भावनिक, शारीरिक आणि मानसिकरित्या किंती गुंतलेलो असतो. परंतु नुकताच बाबा झाल्याने त्यावेळी माझं पूर्ण लक्ष घराकडे असायचं. मी हे काय करतोय आणि का करतोय, असाही विचार मनात आला. बायको आणि मुलाला लवकर भेटता यावं म्हणून मी काम लवकर संपवायचो आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायचो.''
विक्रांत मेस्सीसाठी मागील वर्ष अत्यंत यशस्वी ठरले होते. '१२वी फेल' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे जगभरात कौतुक झाले आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. ब्रेकवर जाण्यापूर्वी त्याने आपले काही प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मात्र, सध्या त्याचे पूर्ण लक्ष केवळ त्याच्या कुटुंबावर आणि मुलावर आहे.