काजोलला पाहून श्रीदेवी का झाली भावुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:11 IST2017-03-14T05:41:11+5:302017-03-14T11:11:11+5:30

श्रीदेवी आणि काजोल. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री. आपला अभिनय आणि सौंदर्यानं अभिनेत्री श्रीदेवी यांनी रसिकांवर मोहिनी घातली होती.विविध ...

Why did Sridevi get emotional to see Kajol? | काजोलला पाहून श्रीदेवी का झाली भावुक?

काजोलला पाहून श्रीदेवी का झाली भावुक?

रीदेवी आणि काजोल. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री. आपला अभिनय आणि सौंदर्यानं अभिनेत्री श्रीदेवी यांनी रसिकांवर मोहिनी घातली होती.विविध सिनेमातून एकाहून एक सरस आणि दर्जेदार भूमिका साकारत श्रीदेवी यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. तर दुसरीकडे अभिनेत्री काजोलनंही नव्वदच्या दशकात रसिकांना वेड लावलं.'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे','कुछ कुछ होता है' अशा सिनेमातून काजोलनं रसिकांवर जादू केली.शाहरुखसह काजोलची जोडी चांगलीच जमली. बॉलीवुडच्या या दिग्गज अभिनेत्री नुकतंच एका फॅशन शोच्या निमित्ताने समोरासमोर आल्या. यावेळी काजोलला पाहून अभिनेत्री श्रीदेवी चांगल्याच भावुक झाल्या.त्यांचं भावनिक होणं उपस्थितांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरला.दोन्ही अभिनेत्रींनी आपापला काळ चांगलाच गाजवला.या काळात लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर त्या होत्या.मात्र करियर ऐन भरात असताना दोघीही विवाहबंधनात अडकल्या आणि त्यानंतर रुपेरी पडद्यापासून काहीशा दूर गेल्या.मात्र दोघींची लोकप्रियता काही कमी झाली. या लोकप्रियतेमुळेच त्यांचं विविध सिनेमातून रसिकांना दर्शन होत राहिलं.कदाचित दोघींमध्ये असलेलं हेच साम्य किंवा दोघींच्या नात्यांमधील आजवर कधीही समोर न आलेला पैलू यामुळे श्रीदेवी यांना आपल्या भावना रोखता आल्या नसतील असं बोललं जात आहे.रोहित शेट्टीच्या दिलवाले सिनेमानंतर काजोल लवकरच तमिळ सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. दुसरीकडे श्रीदेवी मॉम सिनेमाच्या शुटिंगला लवकरच सुरुवात करणार आहेत. 

Web Title: Why did Sridevi get emotional to see Kajol?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.