फवादला का लपवतोय करण??
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 21:09 IST2016-09-18T15:39:05+5:302016-09-18T21:09:05+5:30
करण जोहरच्या बहुप्रतिक्षीत ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मासोबत बॉलिवूडचा हॅण्डसम हिरो ...
.jpg)
फवादला का लपवतोय करण??
क ण जोहरच्या बहुप्रतिक्षीत ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मासोबत बॉलिवूडचा हॅण्डसम हिरो फवाद खान हाही दिसणार आहे. पण ‘ए दिल है मुश्किल’चा टीजर आणि दोन गाण्यांमध्ये फवाद मिसींग आहे. यात फवाद दिसतो पण अगदी काही सेकंदापुरता. ‘ए दिल है मुश्किल’चा टीजर आणि दोन्ही गाण्यांमध्ये खºया अर्थात हायलाईट झालेली दिसतेयं ती रणबीर व ऐश्वर्यामधील हॉट केमिस्ट्री. टीजरमध्ये फवाद केवळ दोन फ्रेममध्ये दिसतो. तर टायटल ट्रॅक व्हिडिओमध्ये त्याचे केवळ चार सेकंदापुरतेच दर्शन होते. ‘बुलेया’ या गाण्यातही फवाद केवळ दोन सेकंदापुरता दिसतो. आमच्यामते, फवादला लपवण्यामागे करणचा नक्की काहीतरी डाव दिसतो. सूत्रांच्या मते, फवादची ‘ए दिल है मुश्किल’मधील भूमिका तुमच्या आमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे आणि करण हे सरप्राईज कुठल्याही स्थितीत उघड करू इच्छित नाही. आम्हाला मिळालेल्या खास माहितीनुसार, फवादचा दमदार अभिनय पाहून करणने म्हणे, चित्रपटातील त्याच्या भूमिकेवर आणखी काम केले. फवाद या चित्रपटात कॅमिओ करणार अशीही माहिती आहे. पण तरिही फवादची भूमिका खास असणार आहे. याच कारणामुळे करण सध्या फवादला लपवत आहे.