अनुष्का शर्मा अन् विराट कोहली एकमेकांकडे एवढ्या रागाने का बघत असावेत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 17:13 IST2017-07-15T11:38:33+5:302017-07-15T17:13:35+5:30

सध्या सेलिब्रिटी जगतात आयफा अवॉर्ड्स २०१७ व्यतिरिक्त आणखी एक बातमी जोरदार चर्चिली जात आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर विचार ...

Why Anushka Sharma and Virat Kohli were so angry with each other? Learn! | अनुष्का शर्मा अन् विराट कोहली एकमेकांकडे एवढ्या रागाने का बघत असावेत? जाणून घ्या!

अनुष्का शर्मा अन् विराट कोहली एकमेकांकडे एवढ्या रागाने का बघत असावेत? जाणून घ्या!

्या सेलिब्रिटी जगतात आयफा अवॉर्ड्स २०१७ व्यतिरिक्त आणखी एक बातमी जोरदार चर्चिली जात आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर विचार केला आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या लव्हबर्डची न्यूयॉर्क वारी आयफाबरोबरच चर्चेत आहे. सध्या दोघेही न्यूयॉर्कमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहेत. या दोघांचा आणखी एक फोटो समोर आला असून, त्यामध्ये अनुष्का आणि विराट एकमेकांना विचित्र पद्धतीने बघत आहेत. एकमेकांकडे बघताना दोघांच्या डोळ्यातील राग घाबरविणारा आहे. 

दोघांचा हा फोटो न्यूयॉर्कमधील एका जनरल स्टोरमधील आहे. दोघांच्याही हातात बास्केट्स असून, एखादी वस्तू खरेदीवरून त्यांच्यात मतभेद झाले असावे, असेच काहीसे फोटोमध्ये दिसत आहे. अनुष्का विराटकडे अतिशय रागाने बघत असून, त्याच अंदाजात विराटही अनुष्काकडे बघत आहे. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या विराटचा वेस्ट इंडिज दौरा संपला असून, लवकरच तो भारतीय क्रिकेट संघासह श्रीलंका दौºयावर जाणार आहे. अशात तो सध्या अनुष्कासोबत न्यूयॉर्क येथे क्वालिटी टाइम व्यतीत करीत आहे. 



काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, अनुष्का आयफा २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली आहे. मात्र अनुष्का आयफासाठी नव्हे तर दुसºयाच कारणासाठी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. वास्तविक अनुष्का संजय दत्तवर आधारित बायोपिकच्या शूटिंगसाठी न्यूयॉर्क पोहोचली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात संजूबाबाची भूमिका साकारत असून, तोदेखील न्यूयॉर्कला पोहोचला आहे. याशिवाय ‘दत्त’ चित्रपटाची टीमदेखील लवकरच तेथे पोहोचणार आहे. चित्रपटात अनुष्का शर्मा एक छोटीशी मात्र तेवढीच दमदार भूमिका साकारणार आहे. चित्रपटात ती पत्रकाराची भूमिका साकारताना दिसेल. याव्यतिरिक्त विकी कौशलदेखील एक भूमिका साकारणार आहे. विकी संजूबाबाच्या एका क्लोज मित्राची भूमिका साकारणार आहे. 

असो, विराट आणि अनुष्काबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या दोघेही न्यूयॉर्कमध्ये एकमेकांची कंपनी एन्जॉय करीत आहे. शिवाय त्यांचे काही फोटोज्ही सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या फोटोमध्ये अनुष्का आणि विराट रस्त्याने फिरताना दिसत होते. आता दुसºया फोटोमध्ये ते शॉपिंग करताना बघावयास मिळत आहेत. 

Web Title: Why Anushka Sharma and Virat Kohli were so angry with each other? Learn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.