कोणासोबत वाढतोय आदित्य कपूरचा ब्रोमान्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 12:16 IST2016-06-29T06:46:15+5:302016-06-29T12:16:15+5:30
बॉलीवूडमध्ये प्रत्येकाचा कोणी ना कोणी ‘बीएफएफ’ असतो. अशीच एक नवी फ्रेंडशिप बहरताना दिसतेय. तुम्हाला अंदाज आला का आम्ही कोणाबद्दल ...

कोणासोबत वाढतोय आदित्य कपूरचा ब्रोमान्स?
तुम्हाला अंदाज आला का आम्ही कोणाबद्दल बोलतोय? नाही? अहो, आपला ‘आशिकी २’ फेम आदित्य रॉय कपूरचा इंडस्ट्रीमध्ये कोणाशी तरी दोस्ताना जरा जास्तच वाढतोय.
कोण आहे त्याचा ‘बीएफएफ’? शाद आली असे त्याचे नाव आहे.
आदित्य रॉय कपूरने नुकतीच ‘ओके जानू’ या सिनेमाची शुटिंग पूर्ण केली. पण चित्रपटाचा दिग्दर्शक शाद अली आणि आदित्यच्या भेटीगाठी काही थांबल्या नाहीत.
प्रथमच एकमेकांसोबत काम करणाऱ्या या दोघांची मैत्री ‘ओक जानू’च्या सेटवर अधिक घट्ट झाली. म्हणूनच तर शुटिंग संपली जरी असली तरी आदित्य वेळोवेळी शादच्या जुहू येथील घरी भेट देत असतो.
म्हणजे आता शाहरुख-करण, रोहित-अजय अशा दिग्दर्शक-अभिनेत्यांच्या द्वयीमध्ये शाद-आदित्यचे नाव जोडले जातेय.