सलमानची ‘नवी गर्लफ्रेन्ड’ आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 19:58 IST2016-11-22T19:34:09+5:302016-11-22T19:58:03+5:30
बॉलिवूडचा ‘दंबग’ स्टार सलमान खान कधी लग्न करेल याची चिंता करणाºयासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. रोमानियन सुंदरी युलिया वंतूरपासून ...

सलमानची ‘नवी गर्लफ्रेन्ड’ आहे तरी कोण?
रविवारी सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘२.०’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. यावेळी निमंत्रण नसताना देखील सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलमध्ये एंट्री मारली. मी स्वत:ला या कार्यक्रमात येण्यापासून रोखू शकलो नाही असे तो यावेळी म्हणाला. मात्र याचवेळी त्याच्यासोबत ‘सिंग इज ब्लिंग’ची अभिनेत्री अॅमी जॅक्सन सोबत असल्याने अनेकांच्या नजरा सलमानपेक्षा तिच्यावर खिळल्या. सलमान व अॅमीसोबत आले होते. सलमान व अॅमीची मैत्री सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे.
फोटो :2.0 च्या टीजर रिलीजच्या वेळी उपस्थित सुपरस्टार रजनीकांत, सलमान खान, अॅमी जॅक्सन व अक्षय कुमार
सलमानचे असे अचानक येण्याचे कारण कोणते यावर चर्चा केली जात आहे. ‘२.०’मध्ये अॅमी जॅक्सनची महत्त्वाची भूमिका असल्याने त्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचे सांगण्यात येते. सलमानने या कार्यक्रमात रजनीकांत व अक्षय कुमारची प्रशंसा केली. आपण रजनी सरांचे फॅन असल्याने या कार्यक्रमाला आलो आहोत असेही तो म्हणाला. मात्र, सूत्रांच्या मते तो रजनीकांत साठी नव्हे तर अॅमी जॅक्सनसाठी कार्यक्रमाला आला होता. कार्यक्रमस्थळी सलमान व अॅमीत असलेले जवळचे संबंध दोघांना लपविता आले नाही हे देखील तेवढेच खरे.
सलमानचा भाऊ सोहेल खान दिग्दर्शित ‘फ्रिकी अली’ या चित्रपटात अॅमीची भूमिका होती. तेव्हापासून सलमान व अॅमीमध्ये चांगली मैत्री झाली होती असे सांगण्यात येते. ‘२.०’च्या कार्यक्रमाला सलमानने केवळ उपस्थिती लावली नाही तर त्याने स्टेजही शेअर केला. तो अगदी अॅमीच्या बाजूला उभा होता.