सलमान खान इतका स्वस्त नाही असं विधान कुणी आणि का केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 11:44 IST2017-09-28T05:31:42+5:302017-09-28T11:44:30+5:30
भाईजान सलमान खान आणि बिग बॉस हा रियालिटी शो गेल्या दशकभराहून अधिक काळापासून जणू काही एक समीकरणच बनले आहे. ...
.jpg)
सलमान खान इतका स्वस्त नाही असं विधान कुणी आणि का केलं?
भ ईजान सलमान खान आणि बिग बॉस हा रियालिटी शो गेल्या दशकभराहून अधिक काळापासून जणू काही एक समीकरणच बनले आहे. सलमान खानशिवाय बिग बॉसची कल्पनाच होऊ शकत नाही. गेले दहा सीझनपासून सलमान खानने बिग बॉस या शोचा होस्ट म्हणून जबाबदारी मोठ्या समर्थपणे पेलली आहे. मात्र गेल्या सीझनमध्ये स्वामी ओमच्या हरकती, वादावादी यामुळे संतापलेल्या सलमानने पुढच्या सीझनमध्ये शो होस्ट करणार नाही अशीच घोषणा केली होती. मात्र तेही स्कीप्टेड असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र यंदा बिग बॉस-11 सीझनची तयारी सुरु झाली त्यावेळी यंदाचा सीझनसुद्धा सलमान खान करणारच असं गृहित धरलं गेलं होतं. मात्र त्याच दरम्यान बी-टाऊनमध्ये चर्चा रंगल्या की बिग बॉस-11च्या शोमधून होस्ट म्हणून सलमान खानची एक्झिट केली आहे. यंदाच्या सीझनमध्ये सलमान खान बिग बॉसमध्ये झळकणार नाही म्हटल्यावर त्याच्या जागी शाहरुख येणार की अक्षय अशा चर्चांनाही उधाण आले. यंदाच्या सीझनमध्ये मानधनाच्या मुद्यावरुन सलमान खान बिग शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचंही बोललं गेलं. मात्र बिग बॉस सीझन-11चा पहिला प्रोमो झळकला आणि सलमानचे फॅन्स खुश झाले. कारण या प्रोमोमध्ये सलमान खान झळकला आणि तो या शोमध्ये सामील होणार नसल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला. मात्र यानंतर सलमान खानने यंदाच्या सीझनसाठी शोमध्ये होस्ट म्हणून दाखल होण्यासाठी किती मानधन घेतलं याच्या चर्चा सुरु झाल्या. विविध माध्यमांमध्ये सलमानने घेतलेल्या मानधनाबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या. या शोसाठी सलमान खानला 11 कोटी रुपये मिळाले अशा चर्चाही रंगल्या. इतकंच नाहीतर या शोसाठी सलमानने प्रत्येक भागाच्या हिशोबाने गलेलठ्ठ मानधन आकारल्याचंही बोललं गेलं. मात्र बिग बॉस-11च्या लॉन्चिंगच्या वेळी शोच्या निर्मात्यांनी याबाबत सूचक विधान केले. सलमानला 11 कोटी रुपये मानधन देण्यात आलं का असा प्रश्न शोच्या लॉन्चिंगच्या वेळी विचारण्यात आला. त्यावेळी सलमान खानची लोकप्रियता पाहता तो काही इतका स्वस्त अभिनेता नाही असं विधान शोच्या निर्मात्याकडून करण्यात आलं. मानधनाच्या मुद्यावर सलमान खाननं मात्र मौन बाळगणंच शहाणपणाचं समजलं.