ब्रेक-अपनंतर प्रियांका चोप्राला कोण शोधून देतेय बॉयफ्रेंड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 13:24 IST2016-12-26T12:15:16+5:302016-12-26T13:24:55+5:30
हॉलीवूड स्टार बनलेल्या प्रियांका चोप्राने यूट्यूब सुपरस्टार ‘सुपरवुमन’ लिलीसिंगसोबत ‘हाऊ टू बी अ गुड विंग वुमन’ नावाचा एक विनोदी व्हिडिओ तयार केला असून सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

ब्रेक-अपनंतर प्रियांका चोप्राला कोण शोधून देतेय बॉयफ्रेंड?
‘ ेसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये गेल्यापासून तिचे सार्वजनिक कार्यक्रमांतील दर्शन दुर्लभ झाले आहे. पण तिच्या चाहत्यांना या वर्षाच्या शेवटी एक सरप्राईज भेट देण्यासाठी तिने यूट्यूब स्टार लिलीसिंग ऊर्फ ‘सुपरवुमन’सोबत एक मजेशीर व्हिडिओ तयार केला आणि ट्विटरवर शेअर केला.
‘हाऊ टू बी अ गुड विंग वुमन’ नावाच्या व्हिडिओमध्ये प्रियांका ब्रेक-अपनंतर ‘सुपरवुमन’पाशी आपली दुखभरी कहाणी सांगत असते. ‘माझा ब्रेक-अप झाले असून माझ्या बॉयफ्रेडने टेक्स्ट मेसेज किंवा कॉल करून नाही तर स्नॅपचॅट व्हिडिओद्वारे ब्रेक-अप केले. कोण करते असे!’
![PeeCee]()
मैत्रीणीचे ब्रेक-अप झाल्यावर एक चांगली मैत्रिण कसे व्हावे याविषयी लिलीसिंग या व्हिडिओमध्ये टिप्स शेअर करते. प्रेमभंगाचा प्रियांकावर एवढा खोलवर परिणाम झाला की, ती स्वत:ला एक दु:खी, निराश पपी समजतेय. ‘माझे प्रेमजीवनाचा ‘द एंड’ झाला’, असे ती सांगते.
![PeeCee pupy]()
आपल्या मैत्रिणीला एवढे हार्टब्रोकन पाहून मग सुपरवुमन तिचा मूड ठीक करण्यासाठी बारमध्ये तिच्यासाठी नवा बॉयफ्रेंड शोधायला सुरूवात करते. प्रेमभंगाचे दु:ख कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे पुन्हा प्रेमात पडणे.
![Lilysingh]()
प्रियांकाला बॉयफ्रेंड मिळवून देण्यासाठी मग ती मुलांना तिच्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते. ‘ती मिस वर्ल्ड राहिलेली आहे’ असे सांगूनही त्या बारमधील मुलं इम्प्रेस का होत नाही हेच तिला कळत नाही.
(जीआयएफ ‘सोर्स’ : Imgflip)
मग अखेर त्यांना कळते की, त्या दोघी ज्या बारमध्ये बसलेल्या आहेत तो समलैंगिक लोकांचा क्लब आहे. मध्यंतर प्रियांकाने लिलीसिंगची सोशल मीडियावर खूप कौतुक केले होते. दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असून या व्हिडिओमध्ये त्यांची केमिस्ट्री दिसून येते. प्रियांका सध्या भारतात आलेली असून करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोवरही ती येणार असल्याची चर्चा आहे.