कोण आहे आध्या आनंद, जी बनलीये नवी ‘नॅशनल क्रश’? रश्मिकाला देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:00 IST2022-01-30T08:00:00+5:302022-01-30T08:00:02+5:30

Aadhya Anand : होय, आध्या सध्या रश्मिका मंदानाला टक्कर देताना दिसतेय. आध्याचे सोशल मीडियावरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Who Is Aadhya Anand New National Crush From Web Series Crushed | कोण आहे आध्या आनंद, जी बनलीये नवी ‘नॅशनल क्रश’? रश्मिकाला देतेय टक्कर

कोण आहे आध्या आनंद, जी बनलीये नवी ‘नॅशनल क्रश’? रश्मिकाला देतेय टक्कर

सिनेमांवर मनापासून प्रेम करणारे सिनेप्रेमी सिनेमांच्या हिरो-हिरोईनवरही तेवढंच प्रेम करतात.  आपल्या अस्सीम सौंदर्याने आणि अदांनी घायाळ करणाºया अनेक नट्या आहेत. काही वर्षांपूर्वी प्रिया प्रकाश वॉरियरच्या अदांनी चाहत्यांना असंच वेड लावलं होतं. तिचा ‘नैन मटक्का’ पाहून सगळेच तिच्यावर भाळले होते. तिची छोटीशी क्लिप व्हायरल होताच, ती एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनली होती. तिच्यानंतर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिच्या अदांनीही चाहत्यांना भुरळ घातली. नॅशनल क्रश असलेल्या रश्मिकावर चाहते फिदा झालेत. आता ‘नॅशनल क्रश’च्या यादीत आणखी एक नाव सामील झालं आहे आणि सध्या सोशल मीडियावर तिचीच हवा आहे.
ही नवी ‘नॅशनल क्रश’ कोण तर आध्या आनंद (Aadhya Anand). होय, आध्या सध्या रश्मिकाला टक्कर देताना दिसतेय. आध्याचे सोशल मीडियावरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. 

आध्या सध्या तिच्या ‘क्रश्ड’ (Crushed) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने आध्या माथूर ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये एक टीनेज लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. यात आध्या चांगलीच भाव खाऊन गेलीये. आता ही आध्या आनंद कोण आहे, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल.
तर आध्या आनंद मूळची कर्नाटकची आहे. पण तिचा जन्म झाला तो सिंगापूरमध्ये. 17 वर्षांच्या आध्याचे आई-वडील  सिंगापूरमध्ये राहतात. 

तुम्ही ‘बॉम्बे बेगम’ ही सीरिज बघितली असेल तर त्या सीरिजमधील आध्याचा चेहरा तुमच्या लक्षात असेलच. तिने ‘बॉम्बे बेगम’  या सीरिजमध्ये अभिनेत्री पूजा भटच्या मुलीची भूमिका साकारली होती.

आध्याने वयाच्या नवव्या वर्षी अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केल. सिंगापूरच्या अनेक सिनेमात आणि टीव्ही शोमध्ये ती झळकली आहे. सिंगापूरच्या लॉयन मम्स, वर्ड व्हिज, स्लाइम पिट अशा अनेक शोमध्ये ती झळकली. अनेक मोठ्या ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केलंय.

Web Title: Who Is Aadhya Anand New National Crush From Web Series Crushed