तुसादमध्ये आणखी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 14:01 IST2016-05-03T08:28:05+5:302016-05-03T14:01:04+5:30

लंडनमधील मॅडम तुसाद म्युझिअममध्ये कोणत्याही सेलिब्रेटीचा पुतळा बनवला जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. या म्युझिअममध्ये पुतळा बनवला गेलेले सुपरस्टार ...

Who else in Tussaud? | तुसादमध्ये आणखी कोण?

तुसादमध्ये आणखी कोण?

डनमधील मॅडम तुसाद म्युझिअममध्ये कोणत्याही सेलिब्रेटीचा पुतळा बनवला जाणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. या म्युझिअममध्ये पुतळा बनवला गेलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन हे बॉलिवुडमधील पहिले सेलिब्रेटी ठरले. अभिनेत्रींमध्ये हा मान ऐश्वर्या रॉय-बच्चनला मिळाला. या दोघांनंतर अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, हृतिक रोशन, अभिनेत्री कतरिना कैफ, करिना कपूर, माधुरी दिक्षित यांचा पुतळा येथे बनवण्यात आला.

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या सेलिब्रेटींचाच पुतळा येथे बनवण्यात येतो. पण काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्माचा पुतळा येथे बनवण्याचे ठरले. या निर्णयानंतर खरंच कपिलचा पुतळा बनवले जाणे योग्य आहे का याची चर्चा सुरू आहे. कपिलच्या कारकिर्दिला जेमतेम काहीच वर्षं झाले आहेत. या इतक्या कमी वर्षांत त्याचा पुतळा बनवला जाणे हे इतरांवर अन्यायकारक नाही का? कपिल हा भारतात प्रचंड प्रसिद्ध असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला तितकेस महत्त्व अद्याप प्राप्त झालेले नाही.

बॉलिवुडमध्ये अनेक वर्षं स्ट्रगल करून आपले नाव कमवणाऱ्या  अनेक जणांचा पुतळा अद्याप बनवण्यात आलेला नाही यावरून कोणत्या निकषावर सध्या मॅडम तुसादमध्ये पुतळा बनवला जातो आहे हे खरेच विचार करण्यासारखे आहे. तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फॅन या चित्रपटातील व्यक्तिरेखेचे कपडे अभिनेता शाहरुख खानच्या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी घालण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार पाहता काही दिवसांनी मालिकेत काम करणारे कलाकार अथवा कोणत्या आयटम गर्लचा पुतळा येथे बनवण्यात आला तर आश्चर्य वाटायला नको. असेच राहिले तर राखी सावंतही मॅडन तुसादमध्ये नक्कीच विराजमान होऊ शकेल.

बॉलिवुडमधील पुढील काही सेलिब्रेटींचे पुतळे लोकांना नक्कीच या म्युझिअममध्ये पाहायला आवडतील : 
priyanka
प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्राने आज केवळ बॉलिवुडमध्येच नव्हे तर हॉलिवुडमध्येही आपली खास जागा निर्माण केली आहे.
akshay kumar
अक्षय कुमार : २० वर्षांहूनही अधिक वर्षं अक्षय बॉलिवुडमध्ये काम करत असून त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अ‍ॅक्शन, कॉमेडी अशा वेगवेगळ्या बाजाच्या भूमिका त्याने साकारल्या आहेत.
ajay dewgan
अजय देवगण : अजय देवगणने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अ‍ॅक्शन हिरो म्हणून केली असली तरी आज अ‍ॅक्शन, कॉमेडी, रोमँटिक अशा सगळ्याच प्रकारच्या भूमिका तो गेली अनेक वर्षं चांगल्या प्रकारे साकारत आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 
irfan khan
इरफान खान : इरफान खानने बॉलिवुडप्रमाणेच हॉलिवुडमध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. ज्युनॅसिक पार्क वर्ल्डसारख्या मोठ्या प्रोजेक्टच्या हॉलिवुड चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
kangna
कंगना रनोट : कंगनाच्या कारकिर्दिला काहीच वर्षं झाले असले तरी तिने तिचे प्रस्थ चांगलेच निर्माण केले आहे. तिला आतापर्यंत तिच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
kajol
काजोल : काजोलने आजवर अनेक हिट चित्रपट केले असून वेगवेगळ्या  प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवुडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.
deepika
दीपिका पादुकोण : ओम शांती ओम या चित्रपटापासून दीपिकाने तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. आजवर तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 
a r rehman
ए. आर. रेहमान : आॅस्कर हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारा ए. आर. रेहमान हा भारतातील एकमेव कलाकार आहे. रेहमानच्या संगीताचे कौतुक केवळ भारतातच नव्हे तर जगभर केलं जातं. 
anil
अनिल कपूर : अनिल कपूरने आपल्या अभिनयातून बॉलिवुडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. स्लमडॉग मिलिनियर या चित्रपटानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवरही त्याला तितकीच प्रसिद्धी मिळाली. आज हॉलिवुडमध्येही त्याला प्रचंड मान आहे.
amir
cnxoldfiles/strong>: बॉलिवुडमध्ये आजच्या घडीला तीन खानांचा दबदबा आहे असे मानले जाते. या तीन खानांमध्ये केवळ आमिरचा पुतळा मॅडम तुसाद म्युझिअममध्ये नाही. आमिरला पुतळ्यासाठी विचारण्यात आले होते. पण त्याने यासाठी नकार दिला असल्याचे म्हटले जाते.

Web Title: Who else in Tussaud?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.