आलिया भट कोणला करतेय खूप मिस?, सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:23 IST2021-03-12T13:22:48+5:302021-03-12T13:23:29+5:30
आलिया भटने नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

आलिया भट कोणला करतेय खूप मिस?, सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट
अभिनेता रणबीर कपूरनंतर आता सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संजय संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संजय लीला भन्साळी सध्या 'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगमध्ये बिझी होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सिनेमाचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. त्यानंतर आलियाने स्वत:ला होम क्वारांटाईन केले आहे. दरम्यान आता आलियाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत खूप मिस करत असल्याचे सांगितले आहे.
आलिया भटने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिले की, खूप मिस करतेय. या फोटोत दोन जण हातात हात पकडून बसले आहेत. या फोटोत फक्त हात दिसत आहे. त्यामुळे ती कुणाला मिस करते आहे हे तिने पोस्टमध्ये सांगितले नाही. त्यामुळे तिच्या या पोस्टवर लोक तू रणबीर कपूरला मिस करते आहेस का असे तर्कवितर्क लावत आहे.
रणबीर कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे कदाचित आलिया रणबीरलाच मिस करत असेल.
रणबीर कपूर आणि आलिया भट गेल्या २ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते. त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातून त्यांच्या चाहत्यांना पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा २०१८ साली करण्यात आली होती. यात आलिया व रणबीर शिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया सारखे कलाकार दिसणार आहेत.
सध्या आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील आलिया भटच्या कामाची प्रशंसा होत आहे.