सोशल मीडियावर धूम करणारी ही ‘ढिंचॅक पूजा’ आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 12:05 IST2017-07-25T06:35:59+5:302017-07-25T12:05:59+5:30
सध्या सोशल मीडिया ‘ढिंचॅक पूजा’ची धूम आहे. कालच तिचे नवे गाणे ‘बापू दे दे थोडा कॅश’ रिलीज झाले. त्यापूर्वी ...

सोशल मीडियावर धूम करणारी ही ‘ढिंचॅक पूजा’ आहे तरी कोण?
- ‘ढिंचॅक पूजा’चे खरे नावही पूजा आहे. २३ वर्षांची पूजा कॉलेजात शिकतेय.
- आपल्या गाण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर टाकून लोकप्रीय झालेली पूजा आता सिंगींगमध्येच आपले करिअर करू इच्छिते. अर्थात पूजाचा आणि गाण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, असे तिच्या टीकाकारांचे म्हणणे आहे. पण पूजाला यामुळे अजिबात फरक पडत नाही. तिच्या गाण्यांचा सूर आणि ताल याच्याशी काहीही संबंध नाही. कुठलाही गायक सूर-ताल सोडून गातो, तेव्हा त्यास ‘क्रिंज पॉप’ म्हणतात. ‘क्रिंज पॉप’ एक वेगळी श्रेणी आहे. यात गायक स्वत:हून इतके ‘बेसूर’ गातो की, त्याचे गाणे सर्वाधिक खराब व्हावे. अमेरिकेन सिंगर रिबेका ब्लॅक ‘क्रिंज पॉप’ची जनक मानली जाते. तिचे ‘फ्राईडे’ हे गाणे सर्वाधिक खराब गाणे जाहिर करण्यात आले होते.
- ‘ढिंचॅक पूजा’चा आवडता रंग आहे काळा आणि सोनेरी. सर्वप्रकारचे फास्ट फूड तिला आवडते. पण बर्गर म्हणाल तर ते तिच्या अतिशय आवडीचे आहे.
- पूजाने आपल्या नावासमोर ढिंचॅक लावले. याचे कारण म्हणजे, याचा अर्थ होतो आपल्याच मस्तीत वावरणारी. पूजाला लहानपणापासूनच लोकांचे मनोरंजन करायचे होते.
- बॉलिवूडमध्ये एक गायिका म्हणून नावारूपास येणे आणि लाइव्ह कॉन्सर्ट करणे, हे पूजाचे स्वप्न आहे
- आपल्या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूजा महिन्याला लाखो रुपए कमावते. ३.२० लाख ते ५० लाख रुपए तिची महिन्याची कमाई आहे. तिच्या व्हिडिओ जेव्हा केव्हा आपण क्लिक करून हसतो वा तिची टर उडवत असतो, त्यावेळी पूजा याच क्लिकच्या माध्यमातून पैसा कमवत असते. म्हणजेच, पूजाला प्रत्येक क्लिकचे पैसे मिळतात.
ALSO READ : ढिंचॅक पूजा पुन्हा आली, नवे गाणे ‘बापू दे दे थोडा कॅश’ आऊट!!
- गुगल जाहिरातींचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास पूजाला प्रत्येक १००० व्ह्यूमागे १ ते १.५ डॉलर कमावते.‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्याचे उदाहरण घेतले तर या गाण्याच्या व्हिडिओला १ कोटी ४० लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत. म्हणजेच या व्हिडिओने पूजाला १३ लाख ६४ हजारांची कमाई करून दिली. म्हणजेच यू-ट्यूबच्या कमाईचा फार्म्युला काय तर प्रति १००० क्लिक्स १ ते १.५ डॉलरची कमाई.