सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 12:15 IST2021-02-09T12:14:29+5:302021-02-09T12:15:37+5:30

आलिया भटने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे.

Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ... | सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भटने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून बॉलिवूडमध्येही अल्पावधीतच स्थान निर्माण केले आहे. आलिया नेहमी चित्रपटाशिवाय दिलखेचक अंदाजासाठी चर्चेत येत असते. एका मुलाखतीमधला आलियाचा एक किस्सा सध्या ऐकायला मिळतो आहे. 


करण जोहरचा शो कॉफी विथ करणमध्ये नेहमी बॉलिवूडचे कलाकार हजेरी लावत असतात. अशात एका एपिसोडमध्ये आलिया भट आणि वरूण धवन गेले होते. या शोमध्ये थट्टा मस्करीत करण जोहरने आलियाला विचारले की, वरूण धवन चांगला किसर आहे का, त्यावर उत्तरात आलिया भटने हो म्हटलं. 


मग, लगेच करण जोहरने विचारले की सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, अर्जुन कपूर या तिघांमध्ये कोण चांगला किसर आहे. आलियाने करण जोहरच्या या प्रश्नावर म्हटले की, मी किस केल्यानंतर त्याची तुलना करत नाही.


आलिया भटने स्टुडंट ऑफ द ईअर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आलिया भटसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर वरूण आणि आलिया आणखी काही चित्रपटात एकत्र दिसले आहेत. याशिवाय आलिया अर्जुन कपूरसोबत २ स्टेट्स चित्रपटात झळकली आहे.


आलियाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर लवकरच आलिया रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती एसएस राजामौलीचा चित्रपट आरआरआरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडमध्ये देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ...