आमिर खानच्या दाढी लूकवर कोण आहे फिदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 14:30 IST2017-02-09T09:00:45+5:302017-02-09T14:30:45+5:30

मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी स्वत:च्या लूकवर काही ना काही एक्सपेरिमेण्ट्स करीत असतो. ...

Who is Aamir Khan's bearded lizard? | आमिर खानच्या दाढी लूकवर कोण आहे फिदा?

आमिर खानच्या दाढी लूकवर कोण आहे फिदा?

स्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान हा त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी स्वत:च्या लूकवर काही ना काही एक्सपेरिमेण्ट्स करीत असतो. ‘दंगल’च्या जबरदस्त यशानंतर आता तो त्याच्या पुढच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला असून, सिनेमातील भूमिकेसाठी त्याने चक्क दाढी वाढवून अतिशय रांगडा असा लूक आत्मसात केला आहे. मात्र त्याच्या या लूकवर एक व्यक्ती जबरदस्त फिदा आहे. ती म्हणजे दुसरं-तिसरं कोणीही नसून त्याची बायको किरण राव आहे. 



प्रोड्युसर आणि डायरेक्टर असलेली किरण राव सध्या पती आमिर खान याच्या ‘दंगल’च्या यशामुळे खूश आहे. त्यामुळेच ती प्रत्येक पार्टीत आमिर खानसोबत आवर्जून उपस्थित असते. केवळ उपस्थितच नाही तर जेव्हा-केव्हा तिला आमिरबाबत विचारले जातेय तेव्हा ती त्याचे तोंडभरून कौतुक करते. तसेच त्याच्या या लूकवर फिदा असल्याचेही जाहीरपणे सांगते. आमिर सध्या त्याचा ‘ठग आॅफ हिंदोस्तान‘ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. या सिनेमासाठी त्याने खास दाढीवाला लूक आत्मसात केला असून, त्यामध्ये तो खºया अर्थाने ‘ठग’ दिसत आहे. मात्र या ठग लूक पत्नी किरण राव हिला चांगलाच भावला आहे. 



गेल्या मंगळवारी आॅस्कर विजेता सिनेमा ‘मूनलाइट’चा मुंबई येथे प्रीमियर शो आयोजित केला होता. या शोसाठी आलेल्या किरण रावने म्हटले की, जर तुम्ही निरीक्षण केले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, त्यांनी दाढी वाढविण्यास सुरुवात केली आहे. खात्रीशीर नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की त्याचा हा लूक मला खूपच इंट्रस्टिंग वाटत आहे. यावेळी त्याच्या ‘ठग आॅफ हिंदुस्तान’ या सिनेमाविषयीही तिला बरेचसे प्रश्न विचारले गेले, परंतु तिला त्याबाबत फारशे सांगता आला नाही, कदाचित आमिर त्याच्या आगामी सिनेमांबाबत किरणशी चर्चा करीत नसावा असेच एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून जाणवले. एक मात्र ती म्हणाली की, सिनेमांची शूटिंग कुठपर्यंत झाली याविषयी मला काहीही माहिती नाही. परंतु आमिर नेहमीच आदि (आदित्य चोपडा) आणि विक्टर (विजय कृष्ण आचार्य) यांना भेटत अन् चर्चा करीत असतो. कधी-कधी तर मला असे वाटतेय की, मी पण त्या चर्चेत सहभागी व्हावे. पुढे बोलताना किरण म्हणाली की, बघुयात काय होतंय ते. आतापर्यंतचा जर विचार केला तर असे वाटतेय की, जे काही झाले ते खूपच रोमांचक असल्याचे ती म्हणाली. यावेळी शोसाठी किरण व्यतिरिक्त राजकुमार राव, कबीर खान, मिनी माथुर, आर्यन मुखर्जी, वासन बाला, प्रियंका बोस आणि टेरेंस लुईस उपस्थित होते. 



दरम्यान, आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार ‘दंगल’नंतर आमिर खान मे महिन्यापासून ‘ठग आॅफ हिंदुस्तान’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आमिरने या सिनेमासाठी खूपच कडक ट्रेनिंग घेतलेली आहे. या सिनेमात तो ‘दंगल’मधील पहिलवानाच्या नव्हे तर सडपातळ व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा सिनेमा २०१८ मध्ये दिवाळीला रिलिज होणार आहे. याचदरम्यान तो ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमावरही काम करीत आहे. हा सिनेमा याच वर्षी रिलिज होणार आहे. सिनेमात ‘दंगल’मध्ये गीता फोगाटची भूमिका साकारणारी जायरा वसीम मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. 

Web Title: Who is Aamir Khan's bearded lizard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.