कोणत्या मंदिराबाहेरुन चोरले हे शूज, Shilpa Shetty हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:19 IST2021-12-23T15:18:30+5:302021-12-23T15:19:00+5:30
सलमान खान (Salman Khan), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि संपूर्ण टीम रियादला रवाना झाली आहे. कोरोनामुळे दरवर्षी परदेशात होणारी सलमानची ही कॉन्सर्ट गेल्या दोन वर्षांपासून होत नव्हती, मात्र यावेळी सलमान ही कॉन्सर्ट करणार आहे.

कोणत्या मंदिराबाहेरुन चोरले हे शूज, Shilpa Shetty हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत
सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे जुने फोटो व्हायरल होत असतात. कधी कधी या फोटोंमुळे सेलिब्रेटींना ट्रोल होण्याची वेळ येते. सध्या असेच घडतय शिल्पा शेट्टीसोबत (Shilpa Shetty) नुकताच तिचा एक फोटो समोर आला. हा फोटो पाहून चाहते मात्र बघतच राहिले. इतंक काय वेगळं असावं तिच्या फोटोत असा विचारही तुम्ही करत असाल तर फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही शिल्पाला ट्रोल केल्याचे कारण समजेल. बऱ्याचदा शिल्पा शेट्टी हटके फॅशन आणि स्टाइल चर्चेचा विषय बनते. सुरूवातीपासूनच आपल्या लूकर विविध प्रयोग करणं तिला आवडतं.शिल्पा शट्टी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग बनली आहे. त्यामुळेच ती आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.
मुळात शिल्पा तिच्या हटके फॅशनसाठी प्रसिद्ध आहे पण अलीकडेच तिने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे ती ट्रोल झाली. शिल्पा शेट्टी नुकतीच दबंग टूरवर गेली असून तिने रियादला भेट दिली आहे. यादरम्यान ती कलिना विमानतळावर दिसली. इकडे फोटोग्राफर्सचे लक्ष त्यांच्या बुटांकडे गेले. शिल्पाने दोन वेगवेगळ्या प्रकारचे शूज घातले होते. जरी शूजचा ब्रँड एक असला तरी शूजची डिझाईन वेगवेगळ्या असल्याने त्यावर पटकन सगळ्यांचे लक्ष गेले. हे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असून एका यूजरने कमेंट केली - यापैकी कोणते शूज तुम्ही मंदिराबाहेरून चोरले आहेत. तर दुसरीकडे अनेक चाहत्यांनीही त्याच्या स्टाईल आणि शूजचे कौतुक केले आहे.
सलमान खान (Salman Khan), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि संपूर्ण टीम रियादला रवाना झाली आहे. कोरोनामुळे दरवर्षी परदेशात होणारी सलमानची ही कॉन्सर्ट गेल्या दोन वर्षांपासून होत नव्हती, मात्र यावेळी सलमान ही कॉन्सर्ट करणार आहे. शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दबंग टूरचा भाग बनली आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यावेळी या टूरचा भाग नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीमुळे अखेरच्या क्षणी त्याला कॉन्सर्टमधून आपले नाव मागे घ्यावे लागले.