​मिसेस फनी बोन्ससोबत कुठे निघालायं अक्षय कुमार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 15:17 IST2017-03-14T09:47:16+5:302017-03-14T15:17:16+5:30

अक्षयने त्याच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु केले आहे. हा चित्रपट आहे, ‘पॅडमॅन’. या चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्याच दिवशी अक्षय ट्विंकललसोबत सेटवर आला. त्याक्षणाचा एक सुंदर फोटो अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Where did Akshay Kumar go with Miss Funnie Bones? | ​मिसेस फनी बोन्ससोबत कुठे निघालायं अक्षय कुमार?

​मिसेस फनी बोन्ससोबत कुठे निघालायं अक्षय कुमार?

्षय कुमार याने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत अक्षय कुमार हा मिसेस फनी बोन्सच्या हातात हातात घालून नदीकाठी निघालाय. आता ही मिसेस फनी बोन्स कोण? तर अक्षयची बेटर हाफ ट्विंकल खन्ना. होय, आता या फोटोमागचे कारणही तुम्हाला कळले पाहिजे. तर हे कारण आहे, अक्षयचा नवा चित्रपट.
अक्षयने त्याच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु केले आहे. हा चित्रपट आहे, ‘पॅडमॅन’. या चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्याच दिवशी अक्षय ट्विंकलसोबत सेटवर आला. त्याक्षणाचा एक सुंदर फोटो अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बल्की करीत असून, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. 




 या चित्रपटात अक्षयसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटींग लवकरात लवकर निपटवण्याचे अक्षयचे प्रयत्न आहे. विना ब्रेक हे शूटींग संपेल, असे सांगितले जातेय. त्यामुळे येत्या वर्षा अखेरिस हा चित्रपट रिलीजसाठी तयार असेल.‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा ‘पॅडमॅन’हा याच मालिकेतील चित्रपट आहे. 

Web Title: Where did Akshay Kumar go with Miss Funnie Bones?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.