​मेरा नंबर कब आयेगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 20:53 IST2016-05-10T15:23:50+5:302016-05-10T20:53:50+5:30

बॉलिवुडमध्ये अनेक वर्षं स्ट्रगल करूनही आपली जागा बनवू न शकणारे अनेक कलाकार आहेत. इतर यशस्वी कलाकारांचे काम आणि त्यांचे ...

When will my number come | ​मेरा नंबर कब आयेगा

​मेरा नंबर कब आयेगा

लिवुडमध्ये अनेक वर्षं स्ट्रगल करूनही आपली जागा बनवू न शकणारे अनेक कलाकार आहेत.

इतर यशस्वी कलाकारांचे काम आणि त्यांचे चित्रपट पाहून ‘मेरा नंबर कब आयेगा’ असे त्यांना नक्कीच वाटत असेल.

हिट चित्रपटांची वाट पाहाणारे असेच काही कलाकार : 

उदय चोप्रा : 

uday chopra

*यश चोप्रा यांचा मुलगा असल्याने ‘मोहब्बते’ या चोप्रा बॅनरच्या चित्रपटाद्वारे उदयने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.
* ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘धूम’, ‘धूम२’, ‘धूम ३’, ’हम तुम’ यांसारख्या तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटात काम करूनही अद्याप त्याला बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवता आले नाही. 
* अभिनयक्षेत्रात जम बसत नसल्याने त्याने चित्रपट निर्मितीकडेही वळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यातही यश मिळाले नाही.

जुगल हंसराज : 

Jugal Hansraj

* जुगलने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 
* त्याने नंतरच्या काळात अभिनेता म्हणूनही अनेक चित्रपटांत काम केले. पण काहीही केल्या त्याला एकही हिट चित्रपट देता आला नाही. 
* सध्या तो अ‍ॅनिमेशन चित्रपटांचे दिग्दर्शन करत असून त्याच्या एका चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 
* जुगल दिग्दर्शनात यशस्वी झाला असला तरी अभिनयात आजही फ्लॉपच आहे.

जॅकी भगनानी : 

jackky-bhagnani_thumb

* निर्माते वाशू भगनानी यांचा मुलगा असलेल्या जॅकीने २००९ साली ‘कल किसने देखा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.
* गेल्या सात वर्षांत त्याने अनेक चित्रपट केले असले तरी एकही हिट चित्रपट दिलेला नाही.
* जॅकीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आतापर्यंत काम केलेल्या सगळ््या चित्रपटाची निर्मिती त्याच्या वडिलांनीच केलेली आहे. 

सिकंदर खेर : 

sikander-khair

* सिकंदरने अभिनयात येण्यापूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्यासोबत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. बॉलिवुडमध्ये सिकंदरचे पदार्पण होण्याआधीपासूनच त्याच्याविषयी उत्सुकता होती. 
* ‘वुड स्टॉक व्हिला’ हा सिकंदरचा पहिला चित्रपट होता. पण प्रेक्षकांनी पहिल्या चित्रपटापासूनच त्याच्याकडे पाठ फिरवली.
* चित्रपटात अयशस्वी ठरल्यानंतर आता त्याने छोट्या पडद्यावर काम करण्याचे ठरवले आहे. 

कुणाल खेमू : 

Kunal Khemu

* ‘जख्म’ या चित्रपटासाठी कुणालला बालकलाकार विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
* बालकलाकार म्हणून मिळालेली लोकप्रियता कुणालला नंतरच्या काळात टिकवता आली नाही.
* कुणालने स्वत:च्या हिमतीवर अद्याप एकही हिट दिलेला नाही.
* कित्येक महिन्यात त्याने एकही चित्रपटात काम केलेले नाही. तसेच त्याला चांगल्या बॅनरच्या चित्रपटाच्या आॅफर्सच येत नसल्याची चर्चा आहे. 

डिनो मोरिया :

Dino-Morea

* डिनो मोरियाने त्याच्या कारर्किदिच्या सुरुवातीला ‘राज’सारखा हिट चित्रपट दिला होता.
* नंतरच्या काळात त्याला त्याचे यश टिकवता आले नाही.
* गेल्या काही वर्षांत तर त्याने चित्रपटांमध्ये केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. 

विवेक आॅबेरॉय : 

Vivek-Oberoi

* विवेकच्या ‘साथिया’ या चित्रपटानंतर त्याचे फॅन फॉलॉविंग प्रचंड वाढले होते. 
* त्याने ‘कंपनी’, ‘शुटआऊट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘क्रिश ३’ यांसारख्या चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
* पण त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सींमुळे तो नेहमीच जास्त चर्चेत राहिला.
* गेल्या तीन वर्षात त्याचा एकही चित्रपट आलेला नाही. ‘राय’ या त्याच्या आगामी चित्रपटाकडून त्याला बऱ्याच अपेक्षा आहेत. 

Web Title: When will my number come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.