जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:38 IST2025-11-05T13:38:05+5:302025-11-05T13:38:41+5:30
Virat Kohli-Anushka Sharma : विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. याच्या जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती.

जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही...
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सर्वाधिक आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. चाहते विराटला 'किंग कोहली' म्हणतात, तर अनुष्काला 'क्वीन' म्हणून संबोधले जाते. विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. याच्या जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. बॉलिवूड आणि स्पोर्ट्सच्या इतर जोडप्यांप्रमाणे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही आपले नाते दीर्घकाळ लपवून ठेवले होते. पण ते अनेकदा एकत्र दिसायचे आणि चर्चेचा विषय बनायचे. ते चाहत्यांचे आवडते होते आणि त्यांना 'विरुष्का' हे नावही चाहत्यांनीच दिले होते. अनेकदा अनुष्काला क्रिकेट सामन्यांमध्ये कोहलीचा उत्साह वाढवताना पाहिले गेले. तर, जेव्हा क्रिकेटर प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसे, तेव्हा अनुष्काला इंटरनेट ट्रोलर्स आपले लक्ष्य बनवत असत.
अनुष्का आणि विराटने त्यांच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. २०१६ वर्ष त्यांच्यासाठी कठीण होते. या वर्षाच्या सुरुवातीला विरुष्काचे कथितरित्या ब्रेकअप झाले होते. ते वेगळे होण्याचे कारण कधीच उघड झाले नाही. मात्र, त्याची वेगवेगळी कारणे सुचवली गेली. काही काळानंतर या जोडप्याचे पॅचअप झाले आणि ते आजही एकत्र आहेत.
सलमानने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला
आधी बातमी आली होती की अनुष्का शर्माचा भाऊ करणेश शर्मा, विराट कोहलीला अभिनेत्रीला परत मनवण्यात मदत करत होता. पण नंतर रिपोर्ट्स आले की, अनुष्काच्या 'सुलतान' चित्रपटातील तिचा सहअभिनेता सलमान खानने या प्रेमींना पुन्हा एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले गेले होते की, सलमान अनेकदा मस्करीत अनुष्काला म्हणायचा की प्रेम एकदाच होते, जर ते खरे प्रेम असेल, तर ते टिकवून ठेव. मानले जाते की सलमानच्या याच सल्ल्याचा अभिनेत्रीने स्वीकार केला होता.
आज विराट आणि अनुष्का एकत्र आहेत. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण होणार आहेत. ते दोन सुंदर मुलांचे पालक आहेत आणि त्यांचे संगोपन भारतापासून दूर लंडनमध्ये करत आहेत.