Tabu : आमिर खानच्या सिनेमातून अचानक झाली होती तब्बूची हकालपट्टी; काय म्हणालेली अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 11:35 IST2023-04-19T11:34:08+5:302023-04-19T11:35:12+5:30

Tabu: माशूक, विजयपथ, प्रेम, साजन की बाहों मे अशा अनेक हिंदी चित्रपटांत तब्बू झळकली आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. याच तब्बूची आमिर खानने एका सिनेमातून ऐनवेळी हकालपट्टी केली होती.

when tabu removed from aamir khan film | Tabu : आमिर खानच्या सिनेमातून अचानक झाली होती तब्बूची हकालपट्टी; काय म्हणालेली अभिनेत्री?

Tabu : आमिर खानच्या सिनेमातून अचानक झाली होती तब्बूची हकालपट्टी; काय म्हणालेली अभिनेत्री?

 तब्बू (Tabu) ही बॉलिवूडची शानदार अभिनेत्री. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत तब्बूने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या. तामिळ व तेलगू इंडस्ट्रीतही तिचा बोलबाला आहे. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, तब्बूचा पहिला सिनेमा तेलगू होता. कुली नंबर १ नावाचा तिचा हा तेलगू सिनेमा १९९१ साली रिलीज झाला होता. यानंतर माशूक, विजयपथ, प्रेम, साजन की बाहों मे अशा अनेक हिंदी चित्रपटांत ती झळकली आणि बघता बघता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. याच तब्बूची आमिर खानने एका सिनेमातून ऐनवेळी हकालपट्टी केली होती.

होय, चर्चा खरी मानाल तर १९९९ साली आलेल्या मन या चित्रपटात तब्बूला कास्ट करण्यात आलं होतं. पण अचानक तब्बूला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तिच्याजागी मनीषा कोईरालाची एन्ट्री झाली. २००१ साली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तब्बू यावर बोलली होती.
आमिरच्या मन या चित्रपटासाठी तब्बूचं नाव फायनल झालं होतं. अगदी फोटोशूटही झालं होतं. मात्र अचानक का कुणास ठाऊक तब्बू या चित्रपटातून आऊट झाली. याचं कारण तब्बूने सांगितलं नाही. पण यावर ती बोलली होती. 

काय म्हणाली होती तब्बू...?
आमिरसोबत काम करायला मिळणार म्हणून मी खूप आनंदी होते. मन चित्रपटासाठी फोटोशूटही झालं होतं. यानंतर काय झालं मला माहित नाही. पण मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं. माझ्यामते, असा गेम बहुतेक अभिनेत्रींसोबत होतो, असं ती म्हणाली होती. खास बात म्हणजे, मन या चित्रपटाशिवाय गोविंदाच्या कुंवारा या सिनेमातूनही तिला असंच ऐनवेळी  काढून टाकण्यात आलं होतं. तिच्या जागी उर्मिला मातोंडकरची वर्णी लागली होती. तब्बू यावर फार काही बोलली नाही. मात्र याबद्दलची निराशा तिने व्यक्त केली होती. चीचीसोबत कुंवारा करायला मिळाला असता तर मज्जा आली असती. पण मी निराश आहे. मला खूप अपमान सहन करावा लागला. अर्थात माझ्या मनात कोणाबद्दलही कुठलाही राग नाही, असंही ती म्हणाली होती.

मन मधून काढून टाकल्यावर आमिरच्या फना या सिनेमात तब्बूने कॅमिओ रोल केला होता. हा छोटासा रोल सोडला तर तब्बू व आमिर दोघांनी कधीच कोणत्या सिनेमात एकत्र काम केलं नाही. गोविंदासोबतही तिने कोणत्याच सिनेमात काम केलं नाही.
 

Web Title: when tabu removed from aamir khan film