धर्मेंद्र यांनी सुभाई घई यांच्या लगावली होती कानशिलात, हेमा मालिनी होत्या कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 10:27 IST2023-10-30T10:22:54+5:302023-10-30T10:27:44+5:30

हेमा मालिनी स्वत: खुलासा केला होता ही, एकदा धर्मेंद्र यांना राग इतका अनावर झाला की त्यांनी सुभाष घई यांच्या कानशिलात लगावली.

when subhash ghai convinced hema malini to wear swimsuit dharmendra got angry did something shocking with director | धर्मेंद्र यांनी सुभाई घई यांच्या लगावली होती कानशिलात, हेमा मालिनी होत्या कारणीभूत

धर्मेंद्र यांनी सुभाई घई यांच्या लगावली होती कानशिलात, हेमा मालिनी होत्या कारणीभूत

अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. आपल्या अनोख्या अ‍ॅक्शन स्टाईलमुळं त्यांना बॉलिवूडचे हिमॅन  असं म्हटलं जातं. धर्मेंद्र यांच्या रागचे किस्सेही बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. हेमा मालिनी यांना घेऊन धर्मेंद्र खूप पझेसिव्ह होते. हेमा मालिनी अस्वस्थ करणारे कोणी काही केले तर धर्मेंद्र यांचा राग अनावर व्हायचे. धर्मेंद्रचा राग किती टोकायचा असायचा याचा खुलासा हेमा मालिनी यांनी केला आहे. कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी खुलासा केला होता की, एकदा धर्मेंद्र यांना इतका राग आला की त्याने दिग्दर्शकाच्या कानशिलात लगावली. 

काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओलसोबत कपिल शर्मा शोमध्ये आल्या होत्या. त्यांनी अनेक मनोरंजक गोष्टी उघड केल्या होत्या. 'क्रोधी' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना धर्मेंद्र संतापले आणि त्यांनी दिग्दर्शक सुभाष घई यांना कानशिलात लागावली होती. 

एक किस्सा शेअर करताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या रागाबद्दल सांगितले होते. 'क्रोधी' चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना हा प्रकार घडला. या चित्रपटात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. हेमा मालिनी यांना स्विमसूट घालावी अशी दिग्दर्शकाची इच्छा होती, परंतु हेमा त्यासाठी तयार नव्हत्या. सुभाष घई यांनी वारंवार विनंती केल्यानंतर, तिने स्विमिंग पूल सीनमध्ये स्विमसूट परिधान केला होता. धर्मेंद्र यांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी शूटिंग सुरु असतानाच दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कानशिलात मारली. हा प्रकार पाहून सेटवर उपस्थित लोकांनी धर्मेंद्र यांचा राग शांत केला.

हेमा मालिनी यांनी कपिल शर्मा शोमध्ये पुढे सांगितले की, ईशा आणि अहाना देओलच्या दोन्ही मुलींच्या जन्माच्या वेळी धर्मेंद्र यांनी संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होते, जेणेकरून त्यांना कोणी त्रास देऊ नये. 

Web Title: when subhash ghai convinced hema malini to wear swimsuit dharmendra got angry did something shocking with director