रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवी झालेली इनसिक्युअर; सिनेमातील सीन करायला लावले होते कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 17:30 IST2023-05-16T17:30:00+5:302023-05-16T17:30:00+5:30

Reema lagoo: 'गुमराह' या चित्रपटात श्रीदेवी आणि रिमा लागू या दोन्ही अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली होती.

when shridevi got afraid of reema lagoo acting read what happens next | रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवी झालेली इनसिक्युअर; सिनेमातील सीन करायला लावले होते कट

रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवी झालेली इनसिक्युअर; सिनेमातील सीन करायला लावले होते कट

मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय दिवंगत अभिनेत्री म्हणजे रिमा लागू. आज रिमा लागू (reema lagoo) यांचं निधन होऊन बरीच वर्ष उलटली. मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. आजही त्या त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत. रिमा लागू यांनी जवळपास २५ वर्ष कलाविश्वात काम केलं. या काळात त्यांनी सर्वाधिक वेळा आईची भूमिका वठवली. विशेष म्हणजे उत्तम अभिनयामुळे हिंदी कलाविश्वात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. ज्यामुळे त्या तुफान लोकप्रिय झाल्या होत्या. इतकंच नाही तर त्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम आपल्या करिअरवर होऊ नये यासाठी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (shridevi) यांनी त्यांचे काही सीन त्यांच्या सिनेमातून हटवले होते.

'गुमराह' या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात श्रीदेवी लीड रोलमध्ये होत्या. तर, रिमा लागू यांनी श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारली होती. परंतु, रिमा लागू यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी इनसिक्युअर झाल्या होत्या. इतकंच नाही तर आपल्या लोकप्रियतेवर परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी चक्क सिनेमातून रिमा लागू यांचे सीन कट करायला लावले होते. त्याकाळी श्रीदेवी टॉपची अभिनेत्री होत्या त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनीही रिमा लागू यांचे सीन कट केले होते.

दरम्यान, रिमा लागू यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यात खासकरुन अजय देवगण, शाहरुख खान, करिश्मा कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, गोविंदा, उर्मिला मातोंडकर आणि काजोल या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली आहे.
 

Web Title: when shridevi got afraid of reema lagoo acting read what happens next