जेव्हा शाहरूख खान आर्यन, अबराम आणि सुहानाला घेऊन दिल्लीतील जुन्या घरी पोहोचला, तेव्हा काहीसे असे घडले...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 04:06 PM2017-08-03T16:06:32+5:302017-08-03T21:37:42+5:30

जेव्हा तुम्ही आयुष्यात प्रचंड यश मिळवता तेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमणे शक्य होत नाही. परंतु जेव्हा जुन्या आठवणींना ...

When Shahrukh Khan reached Aryan, Abram and Sunam's old home in Delhi, it happened to some ...! | जेव्हा शाहरूख खान आर्यन, अबराम आणि सुहानाला घेऊन दिल्लीतील जुन्या घरी पोहोचला, तेव्हा काहीसे असे घडले...!

जेव्हा शाहरूख खान आर्यन, अबराम आणि सुहानाला घेऊन दिल्लीतील जुन्या घरी पोहोचला, तेव्हा काहीसे असे घडले...!

googlenewsNext
व्हा तुम्ही आयुष्यात प्रचंड यश मिळवता तेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमणे शक्य होत नाही. परंतु जेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळते, तेव्हा मात्र तुम्ही आपसुकच त्याकडे ओढले जातात. असेच काहीसे बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्यासोबत काही दिवसांपूर्वी घडले आहे. त्याचे झाले असे की, शाहरूख त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्ली येथे गेला होता. मग काय, दिल्लीतील आठवणींनी तो असा काही व्यथित झाला की, त्याने दिल्लीतील त्याच्या जुन्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी शाहरूख तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला जुन्या घरी घेऊन गेला. शाहरूखची तिन्ही मुले घर बघून रमून गेले. आपल्या वडिलांचे लहानपण याच घरात गेले, या भावनेने ते या घराचे निरीक्षण करीत होते. वास्तविक हे लोक घरात प्रवेश करू शकले नाहीत. कारण जेव्हा शाहरूख मुलांसोबत घराकडे गेला तेव्हा मध्यरात्र झाली होती. शिवाय जे लोक त्या परिसरात राहतात, ते सर्व झोपले होते. 



दिल्ली टाइम्सशी बोलताना शाहरूखने याबाबतचा खुलासा केला आहे. शाहरूखने म्हटले की, ‘मी माझे जुने सी-७३२२३ डीडीए फ्लॅट हे घर बघण्यासाठी रात्री २.३० वाजता गेलो होतो. मला माझ्या मुलांना हे घर दाखवायचे होते. त्यांना सांगायचे होते की, माझे बालपण याच ठिकाणी गेले. मात्र रात्र अधिक झाल्यामुळे आम्हाला घरात जाता आले नाही. परंतु मी तेथील लोकांना असे सांगून आलो की, ‘मी याठिकाणी राहात होतो, माझ्या मुलांना माझे जुने घर दाखवायचे म्हणून येथे घेऊन आलो. तुम्ही लोक झोपलेले आहात, अन्यथा मी तुम्हाला थोडासा त्रास दिला असता.’  

शाहरूखने आज जगातील श्रीमंत लोकांमध्ये स्थान मिळविले आहे. परंतु त्याचे बालपण फारसे आरामदायी गेले नाही. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याअगोदर त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. आज त्याने जे काही मिळविले आहे, त्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली, हेच यावरून दिसून येते. 

Web Title: When Shahrukh Khan reached Aryan, Abram and Sunam's old home in Delhi, it happened to some ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.