सपना चौधरी अन् राखी सावंत WWEच्या रिंगमध्ये नाचतात तेव्हा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 20:50 IST2018-08-05T20:32:23+5:302018-08-05T20:50:19+5:30
गेल्या काही दिवसांत सपना चौधरीचा अंदाजचं बदललाय. अगदी लूकपासून तर तिच्या स्टाईलपर्यंत. तशीही सपनाची लोकप्रीयता कमी नव्हतीच. पण आजकाल तिची लोकप्रीयता आणखीच वाढलीय.

सपना चौधरी अन् राखी सावंत WWEच्या रिंगमध्ये नाचतात तेव्हा...!!
गेल्या काही दिवसांत सपना चौधरीचा अंदाजचं बदललाय. अगदी लूकपासून तर तिच्या स्टाईलपर्यंत. तशीही सपनाची लोकप्रीयता कमी नव्हतीच. पण आजकाल तिची लोकप्रीयता आणखीच वाढलीय. हेच कारण आहे की, देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तिचा डान्स होवो, लगेच तिचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात सपना चौधरी चक्क WWEच्या रिंगमध्ये डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ आहे हिमाचलप्रदेशातील मंडी या गावातला. मंडी येथे WWEची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या इव्हेंटला बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतही हजर होती. दोघीही व्हिडिओत तुफान डान्स करताना दिसताहेत.
सपनाने खूप लहान वयात स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रीय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कायम पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते.