सलमान जेव्हा पैलवानाशी लढतो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:14 IST2016-05-25T09:44:03+5:302016-05-25T15:14:03+5:30

सलमान खान हा ‘सुलतान’ या चित्रपटात हरियाणवी पैलवानाची भूमिका साकारतो आहे. मंगळवारी अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’चा ट्रेलर आऊट ...

When Salman fight with Pawalvan ... | सलमान जेव्हा पैलवानाशी लढतो....

सलमान जेव्हा पैलवानाशी लढतो....

मान खान हा ‘सुलतान’ या चित्रपटात हरियाणवी पैलवानाची भूमिका साकारतो आहे. मंगळवारी अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुलतान’चा ट्रेलर आऊट झाला.
‘जेव्हा अलीने मला या चित्रपटाची कथा सांगितली, त्यावेळी आपण ही भूमिका करु असे वाटले होते. पण जेव्हा शुटींगला सुरुवात झाली, त्यावेळी माझ्या लक्षात आले की माझ्यासमोर खरोखरीचे पैलवान आहेत, केवळ कलाकार नाहीत. मुख्यत: मार्शल आर्टचे शॉटस्चे यात चित्रीकरण करण्यात आले आहे. जेव्हा खरोखरीचे पैलवान प्रतिस्पर्ध्याला उचलतात आणि खाली आदळतात, त्यावेळी खरोखर त्रास होतो. ते १२० ते १३० किलो वजनाचे पैलवान होते., असे सलमान खानने सांगितले.
‘त्यांच्या अंदाजानुसार तुम्ही पैलवानाला उचलून फेकून द्याल. हे मात्र अगदीच अवघड आहे.  सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास सराव, एमएमएसाठीचे ट्रेनिंग तसेच रोज सहा ते सात तास शुटींग हे सारे खूपच अवघड होते. 
हा चित्रपट कोणतेही पात्र समोर ठेवून करण्यात आलेले नाही. अली अब्बास जफरच्या लेखणीतून हे सारे काही उतरले असल्याचे सलमान म्हणाला. 
अनुष्का शर्मा ही सलमानसोबत काम करीत आहे. तिही पैलवानाची भूमिका करीत आहे.

Web Title: When Salman fight with Pawalvan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.