जेव्हा लज्जा सिनेमाच्या सेटवर रेखा यांनी अभिनेत्रीच्या लगावली होती कानशिलात, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:03 IST2023-11-06T12:59:12+5:302023-11-06T13:03:04+5:30
सिनेमाच्या सेटवर रेखा यांनी अभिनेची कानशिलात लगावली होती, यानंतर अभिनेत्रीला चांगलाच धक्का बसला होता.

जेव्हा लज्जा सिनेमाच्या सेटवर रेखा यांनी अभिनेत्रीच्या लगावली होती कानशिलात, अन् मग...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील एकापेक्षा एक रंजक किस्से ऐकायला मिळतात. कधी कधी सेटवर अशा काही गोष्टी घडतात ज्या आयुष्यभर लक्ष राहतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. हा किस्सा अभिनेत्री आरती छाब्रियाशी संबंधीत आहे. सिनेमाच्या सेटवर रेखा यांनी अभिनेची कानशिलात लगावली होती. जाणून घ्या नेमकं काय आहे हे प्रकरण...
आरती छाब्रिया यांनी २००२ मध्ये आलेल्या 'तुमसे अच्छा कौन है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरला होता. यानंतर अभिनेत्रीची अक्षय कुमारच्या चित्रपटात वर्णी लागली. अभिनेत्रीने 'लज्जा' सिनेमात कॅमिओ केला होता त्यावेळी सेटवर जे काही घडलं त्यामुळे आरतीला चांगलाच धक्का बसला होता.
एका सीनमध्ये आरतीला रेखा कानशिलात लगावणार होत्या पण या गोष्टिची कल्पना आरतीला नव्हती. जेव्हा रेखा यांनी तिच्या कानाखाली मारली तेव्हा आरती ढसाढसा रडू लागली. या गोष्टिची खुलासा स्वत: आरतीने एका मुलाखती दरम्यान केला होता. तिने एका मुलाखतीत सांगितले होतं की, 'लज्जा' चित्रपटाच्या सेटवर रेखा यांनी तिला कानाखाली मारली होती. रेखा यांनी शूटिंगदरम्यान तिला मारल्यानंतर ती ढसाढसा रडू लागली होती. आरती सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय असते.
आरतीने वयाच्या तिसऱ्या वर्षी एका जाहिरातीसाठी काम केलं होतं. 2002 मध्ये 'तुमसे अच्छा कौन है' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय तिने 'आवारा पागल दीवाना', 'राजा भैया', 'तीसरी आँख', 'हे बेबी', 'डॅडी कूल' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.