अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 16:57 IST2023-07-12T16:54:06+5:302023-07-12T16:57:02+5:30

'OMG 2'चा टीझर रिलीज झाल्यापासून यात परेश रावल का नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जातोय.

When paresh rawal revealed why he rejected the omg2 | अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर

अक्षय कुमारच्या 'OMG 2' मधून परेश रावल यांनी घेतला काढता पाय, कारण आले समोर

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित  'OMG 2' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आला. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. हा चित्रपट OMG चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेता परेश रावल दिसले होते. 'OMG 2'मध्ये परेश रावल यांची जागा पंकज त्रिपाठीने घेतली आहे. OMG 2 चा टीझर पाहिल्यानंतर परेशच्या चाहत्यांना परेश रावल यांची उणीव जाणवली. 

'OMG 2'मध्ये  परेश रावल का नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जातोय. परेश रावल यांनी एका मुलाखतीत 'ओएमजी'च्या सिक्वेलमध्ये काम न करण्याचे कारण सांगितले आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत 'OMG 2' बद्दल बोलताना ते म्हणाला, "मला 'OMG 2'ची कथा आवडली नाही. मी माझ्या भूमिकेबाबत अजिबात समाधानी नव्हतो. भूमिका एन्जॉय करता येत नव्हती. त्यामुळेच मी चित्रपट साईन करण्यास नकार दिला.

रख विश्वास तू है शिव का दास 
टीझरमध्ये  भोलेनाथच्या लुकमध्ये अक्षयने सर्वांचं मन जिंकलं आहे. १ मिनिट २६ सेकंदाच्या या टीझरमध्ये अक्षयच्या एंट्रीनेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लांब जटा, कपाळी भस्म आणि गळ्यात रुद्राक्ष घालून अक्षयची एंट्री होते. अक्षय आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या अंदाजात दिसत आहे. रख विश्वास तू है शिव का दास! हा अक्षय कुमारचा डायलॉग गाजतोय. 

'ओएमजी 2' मध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी एकत्र काम करत आहेत. यामी गौतमही सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. वेगळं कथानक आणि उत्तम स्टारकास्टमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आशा आहे. टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि प्रेक्षकांच्या आवडतोय. सिनेमात 'रामायण' फेम अरुण गोविल श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना पुन्हा श्रीरामाच्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. अमित राय यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
 

Web Title: When paresh rawal revealed why he rejected the omg2