शाहिदला पाहून मीराच नाही तर तिचे वडीलही घाबरले होते! ‘या’ एका अटीवर लग्न झालंं...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:49 IST2021-11-23T16:48:42+5:302021-11-23T16:49:45+5:30
म्हणायला Shahid Kapoor मोठा स्टार होता, पण मीरा नावाच्या सामान्य मुलीशी लग्न करणं त्याच्यासाठी सोप्प नव्हतं....

शाहिदला पाहून मीराच नाही तर तिचे वडीलही घाबरले होते! ‘या’ एका अटीवर लग्न झालंं...!!
शाहिद कपूर (Shahid Kapoor ) व मीरा राजपूत (Mira Rajput) हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद बॉलिवूडमध्ये रमलेला, झगमगाटात वाढलेला स्टार आणि मीरा ग्लॅमर इंडस्ट्रीचा दूरदूरपर्यंत संबंध नसलेली सामान्य मुलगी. तरीही दोघं एकत्र आले आणि थाटामाटात दोघांचंही लग्न पार पडलं. आता दोघांना दोन मुलं आहेत. म्हणायला शाहिद मोठा स्टार, पण मीरा नावाच्या सामान्य मुलीशी लग्न करणं त्याच्यासाठी सोप्प नव्हतं. हो, मीराशी लग्न करण्यासाठी शाहिदला ब-याच गोष्टी कराव्या लागल्या. खुद्द शाहिदने एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.
पहिलं कारण म्हणजे, मीरा व शाहिदच्या वयातील अंतर. होय, दोघांच्याही वयात बराच फरक होता आणि यामुळे दोघंही चिंतेत होते. मीरा खूप तरूण होती. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी शाहिदला आधी तिच्या बहिणीला ‘पटवावं’ लागलं. होय, मीराच्या बहिणीने शाहिदला साथ दिली आणि मीरा शाहिदची झाली. अर्थात एका अटीवर.
विश्वास बसणार नाही, पण लग्नाआधी मीराने एक अट ठेवली होती. लग्नाची बोलणी सुरू असताना शाहिदने ‘उडता पंजाब’ हा सिनेमा साईन केला होता. या सिनेमासाठी त्याने अख्खा लूक बदीला होता. टॉमीच्या भूमिकेसाठी त्याने केस वाढवले होते, नवी विचित्र हेअरस्टाईल कॅरी केली होती. शाहिद पहिल्यांदा मीरा व तिच्या कुटुृंबाला भेटायला गेला, तो याच लुकमध्ये. त्याचा तो लुक पाहून मीराचं काय तर तिचे वडीलही घाबरले होते.
कशीबशी लग्नाची बोलणी पुढं सरकली आणि मीराने शाहिदसमोर एक अट ठेवली. होय, केसांची स्टाईल आधीसारखीच ठेवावी लागेल आणि केसांना कोणताही कलर करायचा नाही, हीच ती अट. शाहिदने ही अट मान्य केली, तेव्हा कुठे मीरा लग्नासाठी राजी झाली.
मीरा व शाहिद लग्नाआधी केवळ 3-4 वेळा भेटले आणि या भेटीनंतर 2015 मध्ये दोघांनीही लग्न केलं.