जेव्हा मलायका अरोराला आला होता राग, म्हणाली होती - 'मला बनवण्यात सलमानचा हात नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 13:41 IST2021-11-22T13:40:44+5:302021-11-22T13:41:13+5:30
Malaika Arora : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जेव्हा मलायका अरोराला आला होता राग, म्हणाली होती - 'मला बनवण्यात सलमानचा हात नाही'
मलायका अरोरा (Malaika Arora) एक अशी अभिनेत्री आहे जी अलिकडे तिच्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत असते. जेव्हा अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला होता तेव्हा त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्याहूनही जास्त त्यांना तेव्हा ट्रोल करण्यात आलं जेव्हा तिचं नाव अर्जुन कपूरसोबत जुळलं. मलायका आता कपूर्सच्या पार्ट्यांमध्ये दिसते.
आयटम गर्ल म्हणत होते लोक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला सर्वात जास्त लोकप्रियता शाहरूख खानच्या 'दिल से' सिनेमातील' छय्या छय्या' गाण्यामुळे मिळाली होती. त्यानंतर ती अनेक सिनेमातील स्पेशल सॉंगमध्ये दिसली. तिने सलमान खानच्या दबंगमधील 'मुन्नी बदनाम' गाण्यातूनही धमाका उडवून दिला होता. यानंतर मलायकावर टिकाही झाली होती. लोकांनी तिला आयटम गर्ल टॅग दिला होता.
राखी सावंत म्हणाली होती...
सलमान खानच्या परिवारातील असल्याने मलायकाला अनेकदा टिकेचा सामना करावा लागला होता. ड्रामा क्वीन राखी सावंत तर हेही म्हणाली होती की, 'सलमान खानसोबत कनेक्शन असल्याने मलायका अरोराला आयटम गर्ल म्हटलं जातं नाही'. यावर मलायका उत्तर देण्यासाठी समोर आली होती.
काय म्हणाली होती मलायका
मलायका अरोराने २००८ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जर असं असेल तर मी सलमान खानच्या सर्वच सिनेमात असायला पाहिजे. जे गाणे ते करतात त्यात माझा स्पेशल अपिअरन्स असायला हवा. त्यांनी मला बनवलं नाहीये, मी एक सेल्फ मेड महिला आहे'.