माधुरी हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे लागते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 14:44 IST2016-06-01T09:14:10+5:302016-06-01T14:44:10+5:30
माधुरी दीक्षित आणि आमीर खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. १९९० साली या दोघांचा ‘दिल’ हा चित्रपट ...

माधुरी हॉकी स्टीक घेऊन आमीरच्या मागे लागते तेव्हा...
म धुरी दीक्षित आणि आमीर खान यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. १९९० साली या दोघांचा ‘दिल’ हा चित्रपट आला होता. गमतीमध्ये माधुरी दीक्षित एकदा आमीर खानच्या मागे हॉकी स्टीक घेऊन धावत गेली होती. ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना माधुरीने हा किस्सा सांगितला. ४९ वर्षीय माधुरीला कोणापासून प्रेरणा मिळाली? हा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. यावर माधुरीने कोणाचेही नाव घेतले नाही. १९८४ साली माधुरीने अबोध या चित्रपटापासून प्रारंभ केला. बंगाली अभिनेता तपस पॉल हा या चित्रपटात होता. सतत दोन फ्लॉप चित्रपटानंतर एन. चंद्राचा तेजाब हा चित्रपट आला. पाठोपाठ राम लखन आला. दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर दिल तो पागल है, पुकार, साजन असे चित्रपट माधुरीने केले. २०१४ साली ‘गुलाब गँग’ हा तिचा शेवटचा चित्रपट आला.