पहिल्याच चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, कतरिनाच्या बुडत्या करिअरला असा मिळाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:56 IST2023-07-13T12:55:03+5:302023-07-13T12:56:24+5:30
कतरिना कैफला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. पण एकवेळ अशी होती जेव्हा कतरिना ऑडिशन द्यायला जायची आणि तिच्या पदरी निराशा पडायची.

पहिल्याच चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, कतरिनाच्या बुडत्या करिअरला असा मिळाला आधार
कतरिना कैफला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या करिअरमध्ये एका हून एक शानदार सिनेमे बॉलिवूडला दिलेत. कतरिनाचे इथंवरचा प्रवास सोपा नव्हता यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कतरिनाने आपल्या अभिनय कौशल्यावर खूप काम केल्याचे तिच्या चित्रपटांमधून जाणवते. पण एकवेळ अशी होती जेव्हा कतरिना ऑडिशन द्यायला जायची आणि तिच्या पदरी निराशा पडायची.
मॉडेल म्हणून सुरुवात करिअरची सुरुवात करुन त्यानंतर चित्रपटांमध्ये एंट्री करणं अभिनेत्रीसाठी आव्हानात्मक होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका जुन्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला अनेक वेळा ऑडिशनमध्ये नाकारण्यात आले होते. कतरिनाला चित्रपट मिळाला तेव्हा तिला एका शॉटनंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ती कधीच हिरोईन बनू शकत नाही असे तिला सांगण्यात आले होते. कतरिनाचा संघर्ष इथेच संपला नाही. सिनेमे मिळाले तरी हिंदी भाषा शिकण्याचे तिच्यासमोर मोठे आव्हान होते.
बूम हा कतरिनाचा डेब्यू चित्रपट होता. यामध्ये त्याने गुलशन ग्रोवरसोबत अनेक इंटिमेट सीन्स शूट केले. पहिल्याच चित्रपटात कतरिनाने गुलशन ग्रोवरसोबत किसिंग सीन केला होता. हा चित्रपट ठंड बस्त्यात गेला. यानंतर 2005 मध्ये कतरिनाचा 'मैने प्यार क्यूं किया' रिलीज झाला. हा चित्रपट सलमान खानसोबत होता. 'मैने प्यार क्यूं किया' हा पहिलाच चित्रपट होता ज्यात कतरिनाची चांगली भूमिका होती आणि ती पडद्यावर अभिनय करताना दिसली होती. यानंतर तिने अनेक हिट सिनेमा दिले.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, कतरिना कैफकडे श्रीराम राघवनचा मेरी ख्रिसमस आणि सलमान खान स्टारर टायगर 3 पाइपलाइनमध्ये आहे.