करीना कपूरला 'आंटी' म्हणताच लेक सारावर भडकला होता सैफ अली खान, दिली होती सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 13:45 IST2020-12-01T13:45:10+5:302020-12-01T13:45:43+5:30

सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर घडलेला एक भन्नाट किस्सा सारा अली खानने एका टॉक शोमध्ये सांगितला आहे.

When Kareena Kapoor was called 'Aunty', Saif Ali Khan was furious at Lake Sara and gave a stern warning. | करीना कपूरला 'आंटी' म्हणताच लेक सारावर भडकला होता सैफ अली खान, दिली होती सक्त ताकीद

करीना कपूरला 'आंटी' म्हणताच लेक सारावर भडकला होता सैफ अली खान, दिली होती सक्त ताकीद

सैफ अली खान आणि करीना कपूर खान बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैंकी एक आहे. मात्र सैफच्या जीवनात करीनाच्या आधी अमृता सिंग होती. खरेतर सैफ अली खानने आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात अमृता सिंगसोबत लग्न केले होते. अमृतापासून सैफला दोन मुले आहेत सारा अली खान आणि इब्राहीम अली खान. अशात सैफची पहिली पत्नी अमृताची मुले आणि सैफची दुसरी पत्नी करीना यांच्यात कसे नाते आहे, यावर नेहमी प्रश्नचिन्हे उभे केले जाते.

करीना कपूर आणि सारा अली खानचा संबंध आता खूप चांगले आहेत. पण करीनाचे नुकतेच लग्न झालं होते तेव्हा ती आपल्याशी कशी वागेल असा साराला प्रश्न पडला होता. सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर घडलेला एक भन्नाट किस्सा सारा अली खानने एका टॉक शोमध्ये सांगितला आहे.

करीना तिच्या सारा आणि तिच्या भावाशी एखाद्या मैत्रिणीसारखं वागते. त्यांच्याशी सगळ्या विषयावर चर्चा करते. पण सुरूवातीला साराच्या मनात करीनाविषयी शंका होती. करीना एवढी मोठी सुपरस्टार असल्यामुळे ती आपल्याशी नीट वागेल का असा प्रश्न तिला पडला होता. पण करीनाने कधीच तिचे स्टारडम नात्यात आणले नाही, असे सारा सांगत होती.


करीना लग्न होऊन घरी आल्यावर तिला काय हाक मारायची असा प्रश्न तिला पडला होता. करीनाला बेबो म्हणावे असे तिला वाटत होते. त्यानंतर आंटी म्हणावे का असा प्रश्न तिला पडला होता. शेवटी तिने सैफलाच हा प्रश्न विचारला. तिचा हा प्रश्न ऐकून सैफ अली खान चांगलाच भडकला. सैफ म्हणाला, आंटी कोणाला म्हणतेस? करीनाला आंटी म्हटले तर ते तिला अजिबात आवडणार नाही. तिला आंटी सोडून अजून काहीही म्हण. सारालाही सैफचे म्हणणे पटले आता सारा अली खान तिला ‘के’ या नावाने हाक मारते. 


सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायच तर सारा अली खानचा कुली नंबर १ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: When Kareena Kapoor was called 'Aunty', Saif Ali Khan was furious at Lake Sara and gave a stern warning.