जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:55 IST2024-10-14T12:54:48+5:302024-10-14T12:55:43+5:30

Karishma Kapoor And Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान नेटफ्लिक्स शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाल्या होत्या.

When Kareena Kapoor first told her sister about Saif Ali Khan, this was Karisma Kapoor's reaction | जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन

जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेटफ्लिक्स शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाल्या होत्या. करिश्मा कपूरने 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)मध्ये एक रंजक घटना सांगितली आहे. तिला तो दिवस आठवला जेव्हा करीना सैफसोबतच्या तिच्या नात्याबद्दल पहिल्यांदा तिच्याशी मोकळेपणाने बोलली होती.

करिश्मा कपूरने सांगितले की, जेव्हा करीनाने तिला कॉल केला तेव्हा ती लंडनच्या रस्त्यावर फिरत होती. करीना म्हणाली की, मला तुला काहीतरी सांगायचे आहे, त्यामुळे तू कुठेतरी बस. त्यावर करिश्मा म्हणाली मी रस्त्यावर बसू का? करीना म्हणाली नको, जवळपास शांत जागा आहे का? मला वाटतं तू सोफ्यावर बसायला हवं.

जेव्हा करीनाने सैफबद्दल सांगितले
करिश्माला शेवटी एक सोफा सापडला, जिथे ती बसली. ती करीनाला म्हणाली की हो, लवकर सांग, मी शॉपिंगसाठी बाहेर गेले आहे. त्यानंतर करीनाने सैफसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मी सैफवर प्रेम करते आणि तुला माहिती आहे की आम्ही एकत्र आहोत. आम्ही डेटिंग करत आहोत. हे ऐकून करिश्मा थक्क झाली.

करीना-सैफचे २०१२ साली झाले लग्न 
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे २०१२ साली लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत, एकाचे नाव तैमूर अली खान आणि दुसऱ्या मुलाचे नाव जेह अली खान आहे. तैमूरचा जन्म २०१६ मध्ये झाला आणि जेहचा जन्म २०२१ मध्ये झाला. करीनाच्या आधी सैफने अमृता सिंगसोबत लग्न केले होते. सैफला दोन मुले आहेत, त्यांची नावे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत.

वर्कफ्रंट
करिश्मा कपूरच्या करिअरवर नजर टाकली तर ती शेवटची नेटफ्लिक्स शो 'मर्डर मुबारक'मध्ये दिसली होती. सध्या ती 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिॲलिटी शोला जज करत आहे. दुसरीकडे, करीनाचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपट याआधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, तर तिचा दुसरा चित्रपट 'सिंघम रिटर्न्स' दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: When Kareena Kapoor first told her sister about Saif Ali Khan, this was Karisma Kapoor's reaction