जेव्हा जान्हवी कपूरने श्रीदेवीला म्हटले होते वाईट आई, एका गोष्टीमुळे केले होते बोलणे बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:06 IST2021-03-06T13:00:00+5:302021-03-06T13:06:19+5:30
जाह्नवी कपूरला बॉलिवूडमध्ये अवघ्या 3 वर्षांचा कालावधी झाला आहे. श्रीदेवी यांची लाडकी लेक म्हणून तिला रसिकांचीही अल्पावधीतच पसंती मिळाली. लवकरच ती 'रूही', 'दोस्ताना 2' आणि 'गुडलक' सारख्या सिनेमात झळकणार आहे.

जेव्हा जान्हवी कपूरने श्रीदेवीला म्हटले होते वाईट आई, एका गोष्टीमुळे केले होते बोलणे बंद
जाह्नवी कपूर 24 वर्षांची झाली आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या घरी मुंबईत 6 मार्च 1997 रोजी जन्मलेल्या जाह्नवीने 2018 मध्ये 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. जाह्नवीला बॉलिवूडमध्ये अवघ्या 3 वर्षांचा कालावधी झाला आहे. श्रीदेवी यांची लाडकी लेक म्हणून तिला रसिकांचीही अल्पावधीतच पसंती मिळाली. लवकरच ती 'रूही', 'दोस्ताना 2' आणि 'गुडलक' सारख्या सिनेमात झळकणार आहे.
जान्हवीला रुपेरी पडद्यावर झळकताना पाहण्यापूर्वीच श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या अशा एक्झिटने सा-यांनाच सदमा लावून गेली. श्रीदेवी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जान्हवी सध्या अभिनय क्षेत्रात एक से बढकर एक भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र श्रीदेवी आणि जान्हवी दोघांविषयी अनेग गोष्टींच्या चर्चा रंगतात.खुद्द श्रीदेवीने जान्हवीबद्दल एक गोष्ट मुलाखती दरम्यान सांगितली होती. एका गोष्टीमुळे जान्हवी आई श्रीदेवीवर इतकी रागावली होती की, तीन दिवस तिने अबोला धरला होता.
जाह्नवी जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हा तिने श्रीदेवी आणि कमल हासन यांचा 'सदमा' हा चित्रपट पाहिला होता. जाह्नवीने हा चित्रपट पाहिल्यानंतर तीन दिवस श्रीदेवी यांच्याशी बोलली नव्हती. इतकेच नाही तर जाह्नवीने श्रीदेवी वाईट आई असल्याचे म्हटले होते.
श्रीदेवी कमल हासनला सोडून जाते हे पाहून जान्हवीला खूप वाईट वाटले होते. त्यावेळी जान्हवीने श्रीदेवी सांगितले होते की, तू असे वागायला नको होते. कमल हासनला असे सोडून जायला नको होते. कितीही समजूत काढली तरी जान्हवी मात्र एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती. ६ वर्षाची असेलली जान्हवीला सिनेमात ज्या गोष्टी घडतात त्या काल्पनिक असतात हे समजून समजून सगळेच थकले होते मात्र जान्हवी काही ऐकायला तयार नव्हती.
जाह्नवी लहानपणापासूनच आई श्रीदेवी यांच्यानुसारच वागली आहे. श्रीदेवी ज्या गोष्टी सांगतिल त्याच गोष्टी जान्हवी फॉलो करायची. इतकेच नाही तर जाह्नवी बॉलीवूडमध्ये पदार्पण कोणत्या सिनेमातून करणार हे देखील श्रीदेवीनेचे ठरवले होते. मात्र, श्रीदेवीने आपल्या मुलीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच या जगाला निरोप दिला होता. 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांचे निधन झाले.