जेव्हा...जॅकी चॅनने गायले हिंदीत गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 20:31 IST2017-01-21T15:01:42+5:302017-01-21T20:31:42+5:30

जॅकी चॅन हिंदीत गाणे गातानाचा एक व्हीडिओ अभिनेत्री दिशा पटणीने शेअर केला आहे.

When ... Jackie Chan sang in Hindi song | जेव्हा...जॅकी चॅनने गायले हिंदीत गाणे

जेव्हा...जॅकी चॅनने गायले हिंदीत गाणे

नी सुपरस्टार जॅकी चॅन लवकरच ‘कुं फू योगा’ या हिंदी-चिनी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता सोनू सूद व अभिनेत्री दिशा पटणीची महत्त्वाची भूमिका आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने याचे प्रमोशनही जोरदार सुरू आहे.  जॅकी चॅन हिंदीत गाणे गातानाचा एक व्हीडिओ अभिनेत्री दिशा पटणीने शेअर केला आहे. 

हृतिक रोशनची भूमिका असलेल्या बँग बँग या चित्रपटातील ‘तू मेरी मै तेरा’ हे गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणे गाताना जॅकी चॅन थोडा अडखळत होता, मात्र हे गाणे अगदी मजेदार आहे. दिशा ही जॅकीला शब्दांच्या उच्चारणात मदत करताना दिसतेय. या सोबतच आणखी एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, यात दिशा पटणी चिनी गाणे गाण्याचा प्रयत्न करीत आहे. हे गाणे तिने जॅकी चॅनच्या फर्माईशवर गायले आहे. हे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यावर असे लक्षात येते की दिशाची चिनी व जॅकीची हिंदी दोन्ही सारख्याच आहेत. Read More : WATCH: जॅकी चॅन, सोनू सूद आणि दिशा पटानीचा ‘कुंग फू योगा’ ट्रेलर



लवकरच दिशा पटणी व जॅकी चॅन कुं फू योगा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भारत व चीनमधील प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. या चित्रपटात अनेक भारतीय व चिनी अभिनेते दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रोजेक्टसाठी एक गाणे थेट बॉलिवूड स्टाईलमध्ये तयार करण्यात आले आहे. Read More : ​सोनू सूद म्हणतो, जॅकी चॅनकडून खूप काही शिकता आले



कुंग फू  योगाचा आॅफिशिअल ट्रेलर सलमान खानच्या ट्विटर अकाऊंटवरून रिलीज करण्यात आला आहे. सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलेय, ‘धन्यवाद जॅकी चेन हा चित्रपट माझ्या छेदी सिंग (सोनू सूद) ला देण्यासाठी, सर्वांत कुल आहे.’ कुंग फू योगा या चित्रपटात सोनू सूद खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात दिशा पटणी व जॅकी चेन मुख्य भूमिकेत असून आयमारा दस्तूर हिची महत्त्वाची भूमिका आहे. चीनमध्ये २६ जानेवारीला तर भारतात ३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 

ALSO READ : 
सोनू सूदला जॅकी चॅनने काय दिली भेट?
​इम्तियाज अलीचा पुढील चित्रपट जपानी संस्कृतीवर!

Web Title: When ... Jackie Chan sang in Hindi song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.