आयुषने सलमान खानकडे अर्पिताचा हात मागितला तेव्हा, सलमानची होती 'ही' पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 13:15 IST2018-09-01T12:48:52+5:302018-09-01T13:15:16+5:30
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. 'लवरात्रि’ या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये एंट्री घेतो आहे.

आयुषने सलमान खानकडे अर्पिताचा हात मागितला तेव्हा, सलमानची होती 'ही' पहिली प्रतिक्रिया
सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. 'लवरात्रि’ या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये एंट्री घेतो आहे. हा सिनेमा सलमानच्या होम प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात येतो आहे कारण आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा नवरा आहे. सध्या तो आपल्या सिनेमाचे प्रमोशनदेखील करताना दिसतो.
यावेळी त्याला सलमानकडे तो अर्पितासाठी लग्नाची मागणी कशी मागायला गेला तेव्हा त्याची नेमकी काय अवस्था झाली असा प्रश्न विचारण्यात आला. कारण अर्पिता ही सलमानची सगळ्यात लाडकी बहीण आहे हे जग जाहीर आहे.
यावर आयुष म्हणाला सुरुवातीला सलमानकडे त्याच्या बहिणीचा हात मागण्याची माझी हिम्मतच झाली नाही. तरीही मी हिमत दाखवली. सलमानने पहिल्याच भेटीत आपल्या नात्याला होकार दिला. ''तुम्ही तरुण वयात लग्न करण्याचा निर्णय घेत असाल तर काहीच अडचण नाही. मात्र, विवाह केला तर नाते चांगल्या रीतीने टिकवले पाहिजे.'' असे सलमान त्याल्या त्यावेळी म्हणाला.
लवकरच आयुष सिल्वर स्क्रिन आपल्याला दिसणार आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक सिनेमा आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना हुसेन गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते. आयुषयात गरबा टीचरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून वरीना हुसेन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ५ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणारा आहे.