जेव्हा ऐश, सोनमची उडवली जाते खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 15:50 IST2016-05-17T10:01:25+5:302016-05-17T15:50:48+5:30

कान्स फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रींचा लूक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 15 व्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी ...

When Ash, Sonam flew away | जेव्हा ऐश, सोनमची उडवली जाते खिल्ली

जेव्हा ऐश, सोनमची उडवली जाते खिल्ली

न्स फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रींचा लूक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. 15 व्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा यंदाही कान्समध्ये बोलबाला राहिला. तर कान्समध्ये आपला सहावा अपियरन्स देणा-या अभिनेत्री सोनम कपूरचीही कान्समध्ये बरीच चर्चा झाली. मात्र याच अभिनेत्रींचा रेड कार्पेटवरील काहीसा अनोखा अंदाज फॅन्सच्या जोक्सलाही तितकाच हवा देऊन गेला आहे.



'सरबजीत' या आगामी सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी ऐश कान्समध्ये रविवारी अवतरली. यावेळी ऐशनं रामी कादी यांचा फ्लोरल इम्ब्रोडरीवाला गाऊन परिधान केला होता. यावेळी ऐशनं भडक अशी जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. मात्र ऐशचा हा अंदाज फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

ऐशचा हा लूक अनेकांना खटकला. त्यामुळं ट्विटरवर फॅन्सनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. एका नेटिझननं ऐश्वर्याच्या या लिपस्टिकला 'ब्लॅक करंट आईस्क्रीमची' उपमा दिली आहे.


आणखी एका ट्विटर यूजरनं तर ऐशची बरीच खिल्ली उडवली आहे.तुझ्या लिपस्टिकला 'कधी एशियन पेंट्सनं स्पॉन्सर केला आहे का' ? असा सवाल या यूजरनं ऐशला विचारलाय.एकानं तर ऐश 'गुलाब जामुन खाऊन रेड कार्पेटवर आलीस का' ? असा प्रश्न विचारत थट्टा उडवलीय.

 दुसरीकडे सोनम कपूरही कान्समध्ये राल्फ एंड रुसोच्या व्हाईट लाँग गाऊनमध्ये अवतरली होती. मात्र तिच्या या लूकचीही सोशल मीडियावर बरीच खिल्ली उडवण्यात येतेय. एका ट्विटर यूजरनं तर सोनमच्या या व्हाईन गाऊनची तुलना रुमाली रोटीशी केलीय.

Web Title: When Ash, Sonam flew away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.