मध्यरात्री अशा अवस्थेत अनन्या पांडे फिरत होती 'या' अभिनेत्यासोबत, डोळे फाडून पाहत राहिले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 17:00 IST2020-02-29T16:53:58+5:302020-02-29T17:00:00+5:30
अनन्या मध्यरात्री विजयसह बाइक राइडचा आनंद घेत असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते.

मध्यरात्री अशा अवस्थेत अनन्या पांडे फिरत होती 'या' अभिनेत्यासोबत, डोळे फाडून पाहत राहिले लोक
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या आगामी सिनेमात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात नाव आहे 'फायटर'. विशेष म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासह अनन्या काम करणार त्यामुळे सध्या आज मै उपर आसमां निचे अशीच अवस्था तिची झाली आहे.या सिनेमाच्या रूपात तिला जणू लॉटरीच लागली आहे. त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. त्यामुळे हे फोटो शूटिंग दरम्यानचे आहेत. हा सिनेमा हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत.
अनन्या मध्यरात्री विजयसह बाइक राइडचा आनंद घेत असल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. नुकतेच अनन्याचे 'पती पत्नी और ओ' सिनेमात साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
अनन्या पांडेवर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होते . सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. तिथे आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर करत चर्चेत असते. फिल्मफेअर अवॉर्डनंतर तिचे कौतुक करणे तर सोडाच तिची खिल्ली उडवत कॉमेडी मिम्स व्हायरल होत आहेत.