'आराध्यासारखं करणं बंद कर'; ऐश्वर्याचा बालिशपणा पाहून चार लोकांमध्ये गरजले बिग बी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 17:39 IST2023-04-13T17:39:17+5:302023-04-13T17:39:57+5:30
Amitabh bachchan: सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

'आराध्यासारखं करणं बंद कर'; ऐश्वर्याचा बालिशपणा पाहून चार लोकांमध्ये गरजले बिग बी
बॉलिवूडमधील कायम चर्चेत येत असलेलं कुटुंब म्हणजे बच्चन परिवार. या कुटुंबातील जवळपास सारेच लोक कलाविश्वात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांची या ना त्या कारणाने चर्चा होत असते. अभिनेत्री ऐश्वर्या राय या कुटुंबाची सून असून आपल्या मुलीप्रमाणे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन तिच्यावर प्रेम करतात. त्यांच्यातील या गोड नात्याचे अनेक पुरावेही समोर आले आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर बिग बी आणि ऐश्वर्याचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात बिग बी आपल्या सुनेला ओरडताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने केलेल्या एका कृतीमुळे अमिताभ यांनी तिची तुलना आराध्यासोबत केली आहे. इतकंच नाही तर लहान मुलांसारखं वागू नकोस, असा सल्लाही चार लोकांमध्ये दिला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन एका कार्यक्रमात उपस्थित असून ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत आहे. इतकंच नाही तर ती आनंदाच्या भरात अमिताभ बच्चन यांना मिठी मारते. ऐश्वर्याचं हे वागणं पाहून बिग बी थोडे नाराज होतात आणि तिला नीट वागायचा सल्ला देतात. आराध्यासारखं वागू नकोस असं बिग बी म्हणतात. परंतु, काही काळानंतर ते स्वत:चं हसू लागतात.
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी कमालीची प्रतिक्रिया देत आहेत. ऐश्वर्याने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. ऐश्वर्याने २०११ मध्ये आराध्याला जन्म दिला. त्यामुळे ऐश्वर्या-अभिषेकसोबत त्यांच्या लेकीची आराध्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळते.