अक्षय कुमार चिडतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 17:07 IST2016-05-24T11:37:28+5:302016-05-24T17:07:28+5:30
शांत, संयमी असलेल्या अक्षय कुमारने एका टी. व्ही. शो दरम्यान झालेल्या विवादास्पद वक्तव्याला हरकत घेतली. यावेळी तो खूप चिडला ...

अक्षय कुमार चिडतो तेव्हा...
श ंत, संयमी असलेल्या अक्षय कुमारने एका टी. व्ही. शो दरम्यान झालेल्या विवादास्पद वक्तव्याला हरकत घेतली. यावेळी तो खूप चिडला होता. हाऊसफुल-३ च्या फिल्म प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार, रितेश देशमुख, लिसा हेडन आणि जॅकलिन फर्नांडीस कॉमेडी नाईट बचाओच्या सेटवर गेले होते. कृष्णा अभिषेकच्या विनोदावर सारेच हसत होते. यातील काही संवाद तर अगदीच कमरेखालचे होते. एआयबी रोस्टप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे की काय अशी आठवण यानिमित्ताने आली. या चित्रपटातील अभिनेत्रींसंदर्भात काही वाक्ये म्हटली गेली. सिद्धार्थ जाधवने आॅस्ट्रेलियाहून आलेल्या लिसाला कांगारु म्हटले. यापूर्वी त्याने ‘ब्लॅक आफ्रिकन’ अशी वर्णभेदी वक्तव्येही वापरली. त्यानंतर अक्षयला हा प्रकार पाहून चीड आली. त्याने ताबडतोब हे थांबवायला सांगितले. सेटवरील लोकांच्या अनुसार पाणी डोक्यावरुन गेल्यानंतर अक्षयने हस्तक्षेप केला आणि हे थांबविले.